मुंबई : गेल्या वर्षाच्या सुरवातीपासून अनेक थोर व्यक्तींच्या यशोगाथा रूपेरी पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर आता भारताचे आठवे लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव 'सॅम' असे असून चित्रपटाचा नवा लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. खुद्द विकीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याच्या आगामी चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विकीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सॅम माणेकशॉ यांची एक झलक दाखवण्यात आली आहे. त्यानंतर विकी त्यांच्या भूमिकेत असल्याचं दिसून येत आहे. 


महत्त्वाचं म्हणजे सॅम माणेकशॉ यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत चित्रपटाचा नवा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या  दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक मेघना गुलजार यांच्या खांद्यावर आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरूवात २०२१ मध्ये करण्यात येणार आहे.