मुंबई : महाराष्ट्रात आला लॉकडाऊनचे नियम हळू-हळू शिथिल करण्यात येत आहेत. त्यामुळे अभिनेता सुशांत सिंह राजपूत ज्या अपार्टमेंटमध्ये भाडे तत्त्वावर राहात होता, त्या अपार्टमेंटमध्ये नवा भाडेकरू येणार असल्याचं सांगिलं जात आहे. रियल इस्टेट फर्मने दिलेल्या माहितीनुसार केदारनाथ फेम अभिनेता सुशांतने 2019साली हे घर भाडेतत्त्वावर घेतलं होतं. या भव्य घरासाठी तो दर महिन्याला 4.5 लाख रूपये मोजत होता. आता सुशांतच्या घरात कोणी दुसरं राहायला येणार असल्याचं सांगितलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, हे घर लीजवर देण्यात आलं आहे. या घरासाठी आतापर्यंत एकही भाडेकरू आलेला नाही. कोरोना महामारीमुळे ही परिस्थिती उद्भवली असावी असं ,सांगण्यात येत आहे. पूर्वी सुशांत राहात असलेलं हे घर समुद्र किनारी आहे. जे लोक मुंबईत कामासाठी येतात, त्यांच्यासाठी हे घर अतिशय सुंदर आणि भव्य आहे. 



'व्हेयर द हार्ट इज'च्या एका शोमध्ये सुशांतने त्याच्या घराबद्दल सांगितलं. एका चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सुशांतला घराचे फोटो दाखवण्यात आले. तेव्हा सुशांतला एका नजरेचं हे घर प्रचंड आवडलं. त्यानंतर त्याने वांद्रे याठिकाणी असलेल्या या भव्य घरात राहाण्याचा विचार केला. या घरासाठी सुशांतने 36 महिन्यांचा करार केला होता. 


दरम्यान सुशांतने 14 जून रोजी त्याचं घरात गळफास घेवून आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर सुशांतला न्याय मिळायलाचं हवा अशी मागणी केली. एवढंच नाही तर सुशांतची आत्महत्यानसून ती हत्या आहे. अशी चर्चा देखील रंगली होती. सध्या त्यांच्या आत्महत्येप्रकरणी तपास सुरू आहे. शिवाय