डॉ. हाथींच्या निधनानंतर `तारक मेहता..` मध्ये नवा ट्रॅक
लोकप्रिय कॉमेडी शो तारक मेहता का उल्टा चश्मा सुरु होऊन १० वर्ष लोटली.
मुंबई : लोकप्रिय कॉमेडी शो तारक मेहता का उल्टा चश्मा सुरु होऊन १० वर्ष लोटली. या शो ने २५०० एपिसोड पूर्ण केले. पण अलिकडेच डॉ. हाथींच्या अचानक निधनामुळे संपूर्ण टीमवर शोककळा पसरली आहे. कवी कुमार आझाद यांच्या निधानानंतर डॉ. हाथींची भूमिका कोण साकारणार, हा प्रश्न आहे. पण त्यासाठी योग्य कलाकाराचा शोध सुरु आहे. इतकच नाही, तर अभिनेता निर्मल सोनी ज्यांनी काही काळासाठी ‘डॉ. हाथी’ ही भूमिका साकारली होती, तेच पुन्हा एकदा या मालिकेत परतणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
मालिकेचा नवा ट्रॅक
रिपोर्ट्सनुसार, डॉ. हाथींच्या निधनानंतर मालिकेचा पुढचा ट्रक वैष्णोदेवीला शूट करण्यात येईल. मालिकेत आता काही एपिसोड गोकुळधाम सोसायटीचे लोक ट्रिपवर जाणार आहेत. २७ जुलैला ही टीम ट्रिपसाठी जाणार असल्याचे, बोलले जात आहे. ही ट्रिप टीमसाठी नवी सुरुवात असेल.
डॉ. हाथी मालिकेत जिवंत
अलिकडेच शोचे निर्माते अमित मोदी यांनी सांगितले की, डॉ. हाथीचे व्यक्तीरेखा संपवणार नाहीत. ती सुरु ठेवण्यात येईल. कवी कुमार आझाद यांच्या निधनाचे दुःख जरुर आहे पण ही व्यक्तिरेखा शो मध्ये जिवंत असेल. त्यामुळेच आता नवे डॉ. हाथी कोण असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
म्हणून झाले डॉ. हाथींचे निधन
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कवी कुमार आझाद यांचे निधन झाले. वाढलेल्या वजनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरांनी त्यांना बॅरिएट्रिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी डॉक्टरांचा सल्ला मानला आहे. कवी कुमार आझाद यांना वजन कमी करायचे नव्हते. कारण तसे केल्यास त्यांना डॉ. हाथींची भूमिकेला मुकावे लागेल, या भीतीने त्यांनी वजन कमी केले नाही. मोठा खुलासा : डॉ हाथी स्वतः वजन वाढवायचे