मुंबई : बॉलिवूडची देशी गर्ल प्रियंका चोपडाला कोण नाही ओळखत. ती एकमात्र अभिनेत्री आहे जिने बॉलिवूड नंतर हॉलिवूडमध्ये ही चांगलं नाव कमवलं आहे. काही दिवसांपासून तिच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत. आता तिचा साखरपुडा देखील झाल्याचं बोललं जातं आहे. प्रियंका ज्याच्या प्रेमात पडलीये तो हॉलिवूडचा अभिनेता निक जोनस आहे. महत्वाचं म्हणजे संपत्तीच्या बाबतीत तो अंबानींपेक्षा कमी नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार निककडे 200 कोटीहून अधिकची संपत्ती आहे. हा अभिनेता एका शोसाठी 2 कोटी रुपये घेतो. एवढंच नाही तर निक एक गायक देखील आहे. अमेरिकेतील काही प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये त्याचं ही नाव आहे.


निकचे स्वतःचे 4 बंगले आहेत. त्याच्याकडे अनेक आलिशान महागड्या गाड्या देखील आहेत. या गाड्यांची किंमत कोटींच्या घरात आहे. निक आता एक खासगी जेट देखील खरेदी करणार आहे. निक सर्वाधिक फी घेणाऱ्या सेलिब्रिटीजमध्ये मोजला जातो. प्रियांकाने निकसोबत लग्नासाठी सलमानचा सिनेमा भारतला देखील नकार दिला आहे.