पहिल्यांदाच पत्नीच्या वयाविषयी बोलला निक...
काय म्हणाला निक
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सिनेमांबरोबरच खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. प्रियंका आणि निक अनेकदा सोबत असतात. दोघं एकत्र खूप छान दिसतात. आपल्याला माहितच आहे, प्रियंका चोप्रा आणि निक या दोघांमध्ये 10 वर्षांच अंतर आहे. वयामुळे देखील दोघं अनेकदा चर्चेत आले आहेत. पहिल्यांदाच अमेरिकन गायक निक जोनस प्रियंकाच्या वयाबद्दल मोकळेपणाने बोलला.
निक जोनस लोकप्रिय रिऍलिटी शो 'द वॉइस'मध्ये परिक्षकाची भूमिका साकारत आहे. या शोमध्ये त्याच्यासोबत गायिका क्लार्कसन देखील परिक्षकाच्या भूमिकेत आहे. कार्यक्रमात अनेकदा दोघं मस्ती करताना दिसतात. एकदा कार्यक्रमात क्लार्कसनने,'मी 37 वर्षांची आहे. आणि निक तू 27 वर्षांचा आहेस.' तेव्हा क्षणाचाही विलंब न करता निक म्हणाला की,'माझी पत्नी देखील 37 वर्षांची आहे.'
निक जोनसची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. निक आणि प्रियंकाने 2018 मध्ये लग्न केलं आहे. लग्नाच्यावेळी देखील दोघं वयाच्या अंतरामुळे चर्चेत आले होते.
अनेकदा या प्रश्नावर विचारणा केल्यानंतर दोघं आम्हाला यामुळे काहीच फरक पडत नसल्याचं सांगतात. ट्रोल करणाऱ्यांकडे लक्ष न देता त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं निक सांगतो. निक जोनस आणि प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. दोघं कायम आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.