मुंबई : प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (nick Jonas) नुकतेच 2021 ब्रिटिश फॅशन अवॉर्डमध्ये दिसले. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या दरम्यान 2 असे व्हिडीओज समोर आले आहेत ज्यामध्ये प्रियंका आणि निकची जोरदार चर्चा होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक व्हिडीओमध्ये प्रियंका आणि निक एकत्र बसले आहेत. यानंतर प्रियंका, स्टेजकडे जाताना दिसते. ती खुर्चीवर ठेवलेला आपला कोट घेते आणि निघून जाते. निक पुन्हा एकदा प्रियंकाच्या मदतीसाठी उठून जातो. 


एवढंच नव्हे प्रियंका जाता जाता निकला किस देखील करते. या व्हिडीओची सोशल मी़डियावर खूप जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडीओमुळे निकला परफेक्ट जेंटलमन आणि नवरा असल्याची प्रतिक्रिया मिळाली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Jerry x Mimi  (@jerryxmimi)


दुसरा व्हिडीओत प्रियंका आणि निक कार्यक्रमात पोहोचल्याचे दिसत आहे. तेथे उपस्थित असलेला एक चाहता प्रियंकाचं नाव घेऊन ओरडतो. 'प्रियंका I Love You'. हे ऐकून निक आपली मान फिरवतो. आणि तो त्या मुलाला बघू लागतो. यावेळेची निकची रिऍक्शन खूप क्यूट होती


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Jerry x Mimi  (@jerryxmimi)


या अगोदर आणखी एक व्हिडीओ समोर आलेला. ज्यामध्ये प्रियंका आणि निक जेव्हा कार्यक्रमात फोटो क्लिक करायला येतात. तेव्हा निक प्रियंकाच आऊटफिट सांभाळतो. प्रियंकाने देखील निकला पाहून खूप छान स्माईल दिली. 


प्रियंका - निकच्या लग्नाचा वाढदिवस 


आज प्रियांका आणि निकच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस आहे. या दिवशी दोघेही लग्नाच्या बंधनात बांधले गेले. प्रियांका आणि निक हे बॉलीवूड आणि हॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक आहेत. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. दोघेही एकमेकांना वैयक्तिक आणि व्यावसायिक आधार देतात. एकमेकांच्या संस्कृती आणि परंपरांचे पालन करतात. मात्र, काही दिवसांपूर्वी दोघांमधील मतभेदाच्या बातम्या येऊ लागल्याने दोघांचे चाहते नाराज झाले होते.