मुंबई : जागतिक स्तरावर नावाजलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या तुफान चर्चेत आहे. प्रियंका लवकरच आपल्या 'मेमरी अनफिनिश्ड' (memoir Unfinished) पुस्तकाचं प्रकाशन करणार आहे. या पुस्तकामुळे प्रियंका चोप्रा भरपूर चर्चेत आहे. सध्या ती तिच्या आगामी पुस्तकाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान प्रियंकाचा पती आणि गायक निक जोनसने पुस्तकावर त्याच्या पत्नीचा ऑटोग्राफ मागितला. ज्यासाठी प्रिय़ंका लगेचच तयारही झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निक जोनसने प्रियकाच्या 'मेमरी अनफिनिश्ड' पुस्तकाचा एक फोटो शेअर केला, फोटो शअर करत त्याने कॅप्शनमध्ये 'प्रियंका चोप्रा या पुस्तकावर सही करशील?' निकची ही पोस्ट शेअर करत तिने तिच्या इस्टा स्टोरीवर निकच्या या मागणीला होकार दिला आहे. 



मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंकाने आपल्या पुस्तकात एका घटनेचा उल्लेख केला आहे. 'जेव्हा प्रियंका एका दिग्दर्शकाला भेटली होती तेव्हा थोड्या गप्पा झाल्यानंतर त्याने प्रियंकाला उभं राहून गोल फिरायला सांगितलं. प्रियंकाने तसं केलंही. खूप वेळ दिग्दर्शक प्रियंकाला टक लावून पाहत होते. एकटक पाहत त्यांनी प्रियंका ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता.' प्रियंका चोप्राचं 'अनफिनिश्ड' हे पुस्तक ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रियंकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर 'द व्हाइट टाइगर' हा सिनेमा रिलीज होणार आहे.