मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील भिडे मास्तरांची मुलगी सोनू ही भूमिका पार पाडणारी अभिनेत्री निधी भानुशाली, आता मालिकेत नसली तर ती कायम चर्चेत असते. मालिकेत साधी सभ्य असणारी सोनू खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड बोल्ड आणि हॉट आहे. निधीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. निधीने चाहत्यांच्या मनात आपलं स्थान पक्क केलं.   निधी कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता देखील निधीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये निधी जंगलातील तलावात पोहोण्याचा आनंद घेताना दिसत आहे. व्हिडीओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये 'खरा आनंद जंगलात आहे....' असं लिहिलं आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


निधी भानुशालीने 2012 मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. निधीनेही सात वर्षांनंतर म्हणजेच 2019 मध्ये शो सोडला. सध्या ही भूमिका पलक सिधवानी साकारत आहे.


कोण आहे निधीचा बॉयफ्रेंड
काही दिवसांपासून निधी आणि पूर्वीचा पप्पू अर्थात अभिनेता भव्या गांधी यांच्या अफेअची चर्चा रंगली होती. पण निधीच्या मनावर राज्य करणारा भव्या नसून दुसरा व्यक्ती आहे. निधीने एका मुलाखतीत बॉयफ्रेन्डचं नाव सांगितलं आहे. निधीच्या बॉयफ्रेंडचं नाव ऋषी अरोरा (Rishi Arora)  आहे.