मुंबई  : 'दीवार' या सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग 'मेरे पास माँ है' हा डायलॉग अजूनही लोकांच्या मनात आहे. शशि कपूर यांनी अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातील या डायलॉगसाठी निरुपा रॉय यांना विचारलं. या चित्रपटात निरुपा रॉयने दोघांच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांना बॉलिवूड सिनेमातील सर्वात यशस्वी आई देखील म्हटलं जातं. त्यांनी सगळ्यात जास्त अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकरल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहान वयात लग्न आणि अभिनय करण्याची इच्छा
हिंदी चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निरुपा रॉय यांचा जन्म 4 जानेवारी 1931मध्ये गुजरातच्या वलसाड येथे झाला. लहानपणी त्याचं नाव कोकिला किशोर चंद्र बुलसारा होतं. वयाच्या पंधराव्या वर्षीच त्यांचं लग्न कमल रॉय यांच्याशी झालं आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्या आपल्या पतीसोबत मुंबईमध्ये शिफ्ट झाल्या.


मराठी चित्रपटातुन सिनेससृष्टीत पर्दापण
वर्तमानपत्रात सिनेमाची जाहिरात पाहून त्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये पोहोचल्या आणि चित्रपटासाठी त्यांची निवड झाली. चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी त्यांनी आपलं नाव बदलून निरुपा रॉय असं ठेवलं. 1946 मध्ये त्यांना रणकादेवी हा मराठी चित्रपट मिळाला. त्याच वर्षी त्यांना अमर राज या हिंदी चित्रपटासाठीही साइन केलं गेलं आणि अशा प्रकारे निरुपा रॉय यांच्या चित्रपट कारकीर्दीला सुरुवात झाली.


बिमल रॉय यांनी बनवलं यशस्वी अभिनेत्री
७वर्षे  काही चित्रपटांमध्ये काम केल्यावर बिमल रॉय यांचा 'दो बिघा ज़मीन' ऐपिक सिनेमा आला. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्या एक स्थापित अभिनेत्री बनल्या. या चित्रपटाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले. सुरुवातीला निरुपा रॉय यांना बऱ्याच मुख्य भूमिका मिळाल्या, पण नंतर त्यांना आई, वहिनी आणि मोठ्या बहिण अशा भूमिका मिळू लागल्या.



अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील आई
निरुपा रॉय यांनी बऱ्यांच चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती. अमर अकबर अँथोनी, दीवार या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे आईची व्यक्तिरेखा जीवंत झाली. त्यांनी अनेकदा पडद्यावर अमिताभ बच्चन यांच्या आईचं पात्र साकारलं. म्हणूनच चाहते त्यांना सिनेसृष्टीतील अमिताभच्या आई देखील म्हणतात. 1946 ते 1999 या काळात निरुपा रॉय यांनी जवळपास 300 चित्रपटात भक्कम भूमिका साकारल्या. त्यांना तीन वेळा फिल्मफेअर आणि फिल्मफेअर लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.


आईच्या भूमिकेतून रडवलं चाहत्यांना
निरुपा रॉय बहुतेक चित्रपटांमध्ये दुखी: आईच्या भूमिकेत दिसल्या. त्यांच्या अभिनयाने अनेकांचे डोळे पाणावले. चित्रपटांद्वारे बरीच नाव कमावणाऱ्या निरुपा यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला होता. आईची प्रॉपर्टी आणि कोर्टात पोहोचलेलं घर मिळवण्यासाठी त्याच्या मुलांमध्ये भांडण सुरू झाल्याचेही माध्यमांतून बातमी समोर येत होतं. या सगळ्यामध्ये निरुपा रॉय यांचं वयाच्या 73 व्या वर्षी 13 ऑक्टोबर 2004 रोजी निधन झालं.