मुंबई : पुन्हा एकदा मराठी सिनेमा आणि बॉलिवूड यांच्यात संघर्ष होताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदी सिनेमांमुळे मराठीला थिएटर्स मिळत नसल्याचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. येत्या शुक्रवारी सलमान खानचा 'टायगर जिंदा है' हा सिनेमा प्रदर्शित होत असून मराठीतील अंकुश चौधरीचा 'देवा' हा सिनेमा रिलिज होणार आहे. 


टायगरमुळे देवा या सिनेमाला थिएटर्स मिळत नसल्याचं समोर आलं आहे. यामुळे देवाच्या निर्मात्यांनी मनसेकडे धाव घेतली आहे. आता मनसे पाठोपाठ नितेश राणे यांनी देखील सिनेमाला समर्थन दिलं आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांचा स्वाभिमान राखलाच पाहीजे, असं आमदार नितेश राणे यांनी म्हंटलं आहे.



महाराष्ट्रामध्ये ‘देवा’ ला मारुन टायगर जिंदा राहत असेल तर ते थियटरस ना कुठलाच टायगर वाचु शकणार नाही!!  महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांचा स्वाभिमान राखलाच पाहीजे!!, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.


काय आहे नेमकं प्रकरण? 


टायगर जिंदा है या हिंदी सिनेमामुळे देवा या सिनेमाला थिएटर्स मिळत नसल्याने मराठी सिनेमांना थिएटर्स तसंच प्राइम टाइम मिळत नसल्याचा मुद्दा समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला होता. 'देवा' सिनेमाला आपल्या सिनेगृहात प्राईम टाईममध्ये खेळ द्या अशी विनंती केली. सोबतच तुटेल एवढे ताणू नका असा इशाराही दिला आहे.