Nitish Tiwari Ramayana Vijay Sethupathi : नितेश तिवारीच्या रामायण या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रामायण या चित्रपटात दिसणाऱ्या प्रत्येक कलाकाराची भूमिका ही महत्त्वाची आहे कारण ती भूमिका कोण साकारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यात अनेकांची नावं समोर आली आहेत. सनी देओल, लारा दत्ता आणि रकुल प्रीत सिंह ही चित्रपटात दिसणार आहेत. अशात असे म्हटले जात होते की विजय सेतुपती हा विभीषणच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, आता नुकत्याच समोर आलेल्या माहितीमुळे असे म्हटले जाते की कोणी दुसरंच ही भूमिका साकारणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'रामायण' या चित्रपटात विभीषणची भूमिका आता हरमन बावेजा साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. हरमननं हंसल मेहताच्या वेब सीरिज 'स्कूप' मधून प्रेक्षकांच्या मनात जागा केली. त्यात त्यानं जेसीपी हर्षवर्धन श्रॉफची भूमिका साकारली होती. हरमननं या सीरिजमधून प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षक त्याच्या अभिनयाची स्तुती करत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, 'रामायण' मध्ये विभीषणच्या भूमिकेसाठी चित्रपटाच्या टीमनं हरमनशी संपर्क साधला होता. विभीषण विषयी बोलायचे झाले तर तो रावणाचा छोटा भाऊ होता. 


हेही वाचा : 'सूर्यवंशम'मधल्या हीरा ठाकुरचा मुलगा 25 वर्षांनंतर कसा दिसतो?


हरमन बावेजा विषयी बोलायचे झाले तर त्याचे वडील हॅरी बावेजा हे दिग्दर्शक आहेत. हरमननं 2008 मध्ये 'लव स्टोरी 2050' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. प्रियांका चोप्रासोबत त्याचे काही चित्रपट देखील होते. त्यानंर तो 'विक्ट्री', 'व्हाट्स योर राशि', 'ढिशकियाऊं' आणि 'इट्स माई लाइफ' मध्ये दिसली होती. 


नितेश तिवारीचा रामायण चित्रपट 


नितेश तिवारीचा हा चित्रपट एक नाही तर 3 भागात तयार होणार आहे. याचं कारण म्हणजे नितेश तिवारी यांची इच्छा आहे की मोठ्या पडद्यावर 'रामायण' ला संपूर्ण बनवायचं आहे आणि संपूर्ण महाभारत हे दोन तासात दाखवता येणार नाही. तर पहिल्या भागात श्रीराम आणि त्यांच्या कुटुंबाची अयोध्येतील गोष्ट दाखवण्यात येईल.रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या कामाला या वर्षापासून सुरुवात होईल. रणबीर कपूर आणि साई पल्लवीसोबत आधी शूटिंग करण्यात येईल. निर्माते त्याविषयी अधिकृत घोषणा ही 17 एप्रिलला रामनवमीच्या निमित्तानं करणार आहेत. सध्या या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनचं काम सुरु आहे.