'सूर्यवंशम'मधल्या हीरा ठाकुरचा मुलगा 25 वर्षांनंतर कसा दिसतो?

Sooryavansham chota bhanu pratap :  'सूर्यवंशम'मधल्या हीरा ठाकुरचा मुलगा छोटा भानूप्रताप आता काय करतो आणि कसा दिसतो माहितीये? 

दिक्षा पाटील | Updated: Mar 9, 2024, 05:04 PM IST
'सूर्यवंशम'मधल्या हीरा ठाकुरचा मुलगा 25 वर्षांनंतर कसा दिसतो?  title=
(Photo Credit : Social Media)

Sooryavansham chota bhanu pratap : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट हे गाजले आहेत. पण त्यांच्या एका चित्रपटानं अनेक रेकॉर्ड केले. तो चित्रपट आपण लहाणपणापासून सतत पाहत आलोयत... तुम्हाला आठवला का आम्ही कोणत्या चित्रपटाविषयी बोलतोय? तो चित्रपट म्हणजे 'सूर्यवंशम'. हा चित्रपट अनेकदा आपण टिव्हीवर पाहिला आहे. त्यात छोट्या भानुप्रतापची भूमिका साकारणाऱ्या मुलानं तर सगळ्यांची मने जिंकली. त्या मुलाचे दोन सीन्स तर प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहेत. सगळ्यात पहिला जेव्हा तो शाळेच्या बाहेर येतो आणि न कळत त्याच्या आजोबांना भेटतो. तर दुसरा सीन म्हणजे त्यात जेव्हा तो त्याच्या वडिलांकडून खीर घेऊन येतो आणि त्याच्या आजोबांना देतो तो सीन. या लहाणमुलाच्या त्या भोळ्या स्वभावानं प्रेक्षकांना इंप्रेस केलं. आता हा मुलगा मोठा झाला आहे. तर तो आता काय करतो हे जाणून घेऊया.

या मुलाचं नाव आनंद वर्धन आहे. तर 'सूर्यवंशम' हा चित्रपट प्रदर्शित होऊन 25 वर्ष झाली आहेत. तेव्हाचा गोंडस मुलगा आता हॅन्डसम झाला आहे. आनंद वर्धननं हीर ठाकुरच्या मुलाची भूमिका साकारली होती. तो त्यावेळी वयानं लहाण असला तरी त्याच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली. आजही अनेक लोक हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहतात. आनंद वर्धननं 25 चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं आहे. मात्र, नंतर अभ्यासामुळे तो चित्रपटसृष्टीपासून लांब झाला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'सिग्नलवर मला थांबवलं...'; महिला दिनी प्रियदर्शनी इंदलकरची मुंबई पोलिसांशी गाठभेट होते तेव्हा

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आनंद वर्धन हा आता 33 वर्षांचा आहे. तो आता फार हॅन्डसमही दिसतो. आनंद वर्धननं कम्प्युटर सायन्समध्ये बीटेकचं शिक्षण पूर्ण केलं आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर आनंद वर्धननं सोशल मीडियावर त्याच्या अकाऊंटवरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करु लागला. दरम्यान, अशी चर्चा आहे की तो लवकरत तेलगू चित्रपटांमध्ये एक लीड कलाकार म्हणून दिसणार आहे. त्याच्या वडिलांचे नाव पीबी श्रीनिवास आहे. ते एकेकाळी लोकप्रिय गायक होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वडील गायक असल्यामुळे आनंदचे चित्रपटसृष्टीतील लोकांच्या घरी येणं जाणं सुरु असायचं. यांच्यापैकी कोणाला आनंदमध्ये असलेला गोंडसपणा फार आवडला आणि त्याला चित्रपटात कास्ट करण्यात आलं. आनंद हा 3 वर्षांचा असल्यापासून चित्रपटसृष्टीत काम करतोय. Priyaragalu हा त्याचा पहिला चित्रपट होता.