मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही 'भारत' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सत्यमेव जयते'मधील 'दिलबर' गाण्यामुळे नोरा इंटरनॅशनल स्टार ठरली आहे. तिचं हे गाणं अनेक भाषांमध्ये चित्रित केलं गेलं आहे. नोरा सोशल मीडियावरही सतत चर्चेत असते. नुकताच नोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओला अनेक चाहत्यांची पसंती मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नोराने 'काही वेगळंच होण्यास सुरुवात झाली आहे...पाहात राहा' असं लिहिलं आहे. व्हिडिओमध्ये नोरा फतेही सहाय्यक दिग्दर्शक स्टिवन रॉय थॉमससह दिल्ली विमानतळावर दिसतेय. दोघे एकत्र चालत असताना अचानक एक चाहती धावत येते आणि बाजूला नोरा उभी असताना तिला बाजूला करुन ती स्टीवनसह सेल्फी घेते. यावेळी बाजूला उभी असलेली नोरा आश्चर्यचकित आणि काहीशी नाराजीच्या नजरेने पाहतच राहते. त्याचवेळी एक दुसरा चाहता येतो आणि नोरासोबत सेल्फी काढतो. गेल्या २१ तासांमध्येच या व्हिडिओला १ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 



'बिग बॉस ९' मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री केल्यानंतर नोरा प्रसिद्धीझोतात आली होती. परंतु ३ आठवड्यातच बिग बॉसमधून बाहेर पडली होती. नोरा फतेही तिच्या जबरदस्त नृत्य शैलीसाठी ओळखली जाते. २०१८ मध्ये यूट्यूबवर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या गाण्यांच्या यादीत नोराचं 'दिलबर' गाणंही सामिल आहे.