मुंबई : डान्सिंग क्वीन नोरा आपल्या अदांनी चाहत्यांच्या मनावर नेहमी राज्य करते. तिचा लूक, डान्स तिचं सौंदर्य घायाळ करणारं आहे. तिच्या फोटोची आणि व्हिडीओची चाहते आतूरतेनं वाट पाहात असतात. नोरा आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर अपडेट्स देत असते. आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. त्या व्हिडीओनं चक्क सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्याची मुद्रा निर्माण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं म्हणतात की एकसारखे दिसणारे 7 लोक असतात. आता नोराची हुबेहुब कॉपी समोर आली आहे. ही नोराची कॉपी पाहून तुम्हीही थक्क व्हाल. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नोरालाही कदाचित हा व्हिडीओ पाहिल्यावर हसू आवरणार नाही. या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती नोरासारखी असल्याचा भास होत आहे. 


सर्वात अजब गोष्ट म्हणजे नोरा फतेहीसारखी दिसणारी व्यक्ती मुलगी नाही तर मुलगा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला नोरा फतेहीसारखा दिसणारा मुलगा दिसेल 


नोरा फतेही सारखा हुबेहुब दिसणारा मुलगा कसा असू शकतो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर  हा व्हिडीओ तुम्ही पाहायला हवा. यामध्ये दिसेल की हा तरुण मुलगा नोरा फतेहीसारखा दिसत आहे. तुम्ही याला पहिल्यानंतर तुम्हाला 2 सेकंदासाठी ही नोराच आहे का असं वाटू शकतं. तुमचीही नजर फसू शकते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Video Nation (@nation.video)


सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे का की खरा आहे याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र हा सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय बनला आहे. झी 24 तास या व्हिडीओची कोणतीही खातरजमा करत नाही.