मुंबई : अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) कायम तिच्या डान्स आणि घायाळ अदांमुळे चर्चेत असते. 'दिलबर' गर्लच्या प्रत्येक ठेक्यावर चाहते फिदा होतात. कायम सोशल मीडियावर सक्रिय असणारी नोरा आता मात्र वेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील नोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आता पर्यंत आपण नोराचा घायाळ करणार डान्स आणि हॉट फोटो पाहिले आहेत, पण या पलिकडे जाऊन नोराने तिच्यातिल आणखी एक कौशल्य चाहत्यांना दाखवून दिलं. ते म्हणजे विनोद करण्याचं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नोराच्या आईने मुलीच्या लग्नासाठी काही मुलांचे फोटो आणले. पण नोरा लग्नाला नकार देते आणि त्यानंतर अभिनेत्रीची आई तिला चांगलाच तोरा दाखवते. पाहा नोराचा फनी व्हिडीओ 



व्हिडीओमध्ये नोरा फतेही एक मजेदार व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, एकीकडे नोरा तिच्या स्टाईलमध्ये दिसत आहे तर दुसरीकडे ती तिच्या आईची भूमिका साकारत आहे. 


एकाचं व्हिडीओमध्ये नोराने आईची भूमिका देखील साकारली आहे. सध्या नोराचा हा फनी व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या व्हिडीओवर अनेक चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.