आपल्या कोकणात इतके सुंदर लोकेशन असताना कशाला जायचं परदेशात? अप्रतिम फोटो पाहून प्रेमात पडाल

कोकणातील हे अप्रतिम फोटो पाहून कोकणातील निसर्ग सौंदर्याच्या प्रेमात पडाल.

| Jul 03, 2024, 23:36 PM IST

Konkan Tourism Places :  येवा कोकण आपलास असा... असं म्हणतात. कोकण म्हणजे स्वर्गाची अनुभूती असं म्हणतात. हे खरंच आहे. आपल्या कोकणात इतके सुंदर लोकेशन  इतके सुंदर लोकेशन आहेत. यांच्या पुढे परदेशातील लोकप्रिय टूरीस्ट डेस्टिनेशनही फेल ठरतील. पाहा कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे अप्रतिम फोटो.

 

1/7

 कोकण म्हणजे महाराष्ट्राची शान. कोकणातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य पर्यटकांना मोहिनी घालते. 

2/7

समुद्र किनारी होणारी मासेमारी, किनाऱ्यावर असलेली गाव, इथली संस्कृती तसेच अनेक ठिकाणी असलेली लहान लहान बेटं... इथं असलेली सुंदर लोकेशन परदेशातही पहायला मिळणार नाहीत. 

3/7

कोकणात अनेक ठिकाणी नदी आणि समुद्रचा संगम होतो. अशा ठिकाणी बॅक वॉटर मध्य नौका विहार करण्याचा अनुभव तर अविस्मरणीय असा आहे.

4/7

फक्त समुद्र किनारेच नाही तर गर्द झाडी, डोंगर दऱ्या देखील कोकणच्या निसर्ग सौंदर्यात भर घालतात. 

5/7

शांत, निवांत आणि गर्दी पासून दूर असलेले समुद्र किनारे पाहून पर्यटक हरखून जातात. 

6/7

7/7

महाराष्ट्र टूरीजमने कोकणातील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून आयुष्यात एकदा तरी कोकणात फिरायला जायचं असं फोटो पाहणाऱ्यांच्या मनात येईल.