मुंबई : अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही फार कमी वेळात लोकप्रिय आहे. तिने तसे फारसे सिनेमा केले नाहीत मात्र तरिही तिने तिच्या अंदानी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अभिनेत्री सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहे यात शंका नाही. तिने तिच्या मेहनतीच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. असं कोणी क्वचितच असेल जे नोराला ओळखत नसेल. दिलबर गर्ल म्हणून नोराला ओळखलं जातं. आज नोरा तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे.  नोराचा जन्म 6 फेब्रुवारी 1992 साली कॅनडा देशात झाला. मात्र तिला खरी लोकप्रियता मिळाली ती भारतातच. नोराने तिच्या सुंदर लूक आणि बेली डान्सने लाखो चाहत्यांची मने जिंकली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोराचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने एखादी पोस्ट शेअर करताच ती काहीच वेळात व्हायरल होते. मात्र आज आम्ही तुम्हाला तिच्याबद्दल अशी एक गोष्ट सांगणार आहोत जे ऐकून तुम्हालाही धक्का बसणार आहे. नोरा फतेही आता बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध नाव असूनही, तिला कॅनडामध्ये खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. अभिनेत्री बॉडी शेमिंगची शिकार झाली आहे.


नोरा अभिनेत्रीम्हणून प्रसिद्धी मिळवण्याआधी कॅनडामध्ये एका हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम करत होती. नोराने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता की, ती बारिक असल्या कारणाने तिला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता तिच्या म्हणण्यानुसार कॅनडातील मुलांना बारिक मुली आवडत नाहीत.


याबबत खुलासा करताना नोरा म्हणाली की, ''बारीक असणं फारसं तिथल्या लोकांना आवडत नाही. ही एक सांस्कृतिक मानसिकता आहे आणि म्हणूनच आपण खात राहतो," ती म्हणाली, वेट्रेस बनणं खूप कठीण आहे. तुमच्याकडे संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व असायला हवं, तुमची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे. काहीवेळा, ग्राहक वाईट असू शकतात, म्हणून तुम्हाला परिस्थिती हाताळण्यास सक्षम असणं आवश्यक आहे."


याच मुलाखती दरम्यान पुढे नोराला विचारण्यात आलं की, तु एक फूडी असताना तुझी फिगर कशी मेंटेन ठेवतेस? यावर नोरा म्हणाली, ''मी अशा संस्कृतीतून आले आहे जिथे बारिक असणं फारसं  लोकांना आवडत नाही. आम्हाला महिलांच्या शरीरात जाडी आणि ओरिजनल फिगर आवडते. माझ्यासाठी, मी नेहमी चरबी आणि टोन्ड मिळवण्याचा आणि वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असते. ही आपली सांस्कृतिक मानसिकता आहे, म्हणूनच आपण खात राहतो."