Watch: नोरा फतेहीची अभिमानास्पद कामगिरी; FIFA FanFest 2022 मध्ये फडकवला तिरंगा!
Nora Fatehi: बॉलिवूड अभिनेत्री नोरी फतेहीने FIFA FanFest 2022 मध्ये अभिमानास्पद काम केल्याचं दिसून आलं. नोराने तिरंगा फडकवल्याने अनेकांनी तिचं कौतूक केलंय. मात्र, काहींनी तिला ट्रोल देखील केलंय.
Nora Fatehi Wave Indian Flag At FIFA FanFest: जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉलच्या (Football) महाकुंभास धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली. कतारमध्ये खेळला जात असलेल्या FIFA World Cup 2022 ला जगभरातून प्रतिसाद मिळताना दिसतोय. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री नोरी फतेहीने FIFA FanFest 2022 मध्ये अभिमानास्पद काम केल्याचं दिसून आलं. फिफा वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला सहभागी होता आलं नसलं तरी नोराने (Nora Fatehi Wave Indian Flag) भारताचा तिरंगा फडकावला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा (Nora Fatehi) फिफा वर्ल्ड कपमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी फिफाच्या फनफेस्टमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यावेळी हाय ये गरमी, ओ साकी साकी या गाण्यावर अफलातून डान्स परफॉर्मन्स (Dance performance) दिला. त्यावेळी नोराचा तोरा पाहून अनेकांची शुद्धच हरपली. तिच्या डान्सने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं.
नोराचा डान्स झाल्यानंतर तिने भारताचा तिरंगा (Tiranga) हातात घेतला आणि फडकवला. त्यानंतर तिने जय हिंदच्या (Jay Hind) घोषणा देखील दिल्या. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील पहायला मिळाला. नोराने फिफा वर्ल्ड कपमध्ये भारताचा राष्ट्रध्वज (Indian Flag Tiranga) फडकवल्यानं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.
पाहा व्हिडीओ -
दरम्यान, नोराने तिरंगा फडकवल्याने अनेकांनी तिचं कौतूक केलंय. मात्र, काहींनी तिला ट्रोल देखील केलंय. डान्स झाल्यानंतर नोराने तिरंगा पहिल्यांदा बरोबर पकडला. मात्र, त्यानंतर तिने दुसऱ्यांदा तिरंगा उलटा पकडला होता. त्यामुळे काही नेटकऱ्यांकडून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे.