Noraच्या डान्सवर आई-वडिलांना होता तिरस्कार; आता म्हणतात...
बॉलिवूडमध्ये करियर करण्यासाठी अनेक कलाकारांना खस्ता खावा लागला.
मुंबई : बॉलिवूडमध्ये करियर करण्यासाठी अनेक कलाकारांना खस्ता खावा लागला. पण त्यांच्या जिद्दीने आणि मेहतीने त्यांनी स्वतःचं एक विश्व तयार केलं. या कठीण प्रसंगात काहींना त्यांच्या कुटुंबाची साथ मिळाली, तर कहींनी मात्र हा खडतर प्रवास एकट्याने सुरू ठेवला. असं घडलं आहे, बॉलिवूडची डान्सिग क्विन अभिनेत्री नोरा फतेही सोबत. नोराला लहानपणापासून डान्सची आवड होती. पण नोराच्या कुटुंबाला तिचा डान्स मान्य नव्हता.
आता चाहत्यांच्या मनात राज्य करणाऱ्या नोराने अनेक संकटांचा सामना केला आहे. तिने अनेक ऑडिशन दिली, रिजेक्ट झाली. पण तिने प्रयत्न करणं काही सोडलं नाही. पण एका संधीने नोराच्या करियरला चांगलीचं कलाटणी मिळाली. नोराने अनेक मुलाखतींमध्ये घरच्यांना डान्स आवडत नाही. म्हणून सांगितलं आहे.
तिच्या आई-वडिलांना डान्सचा तिरस्कार होता. नोराला घरी डान्स करण्याची देखील परवानगी नव्हती. घरी ती कोणाच्या न कळत डान्स करायची. पण अनेकवेळा तिने यासाठी मारपण खाल्ला. नोराला लहानपणापासूनच अभिनय आणि डान्समध्ये आवड होती आणि तिनेची आवड जपत स्वतःच्या स्वप्नांना नवे पंख दिले आहेत.
पण आज नोराने त्याच डान्सच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं नाव कोरलं आहे. आता तिच्या आई-वडिलांना नोरावर गर्व वाटतो. नोराला मिळालेल्या यशानंतर तिच्या कुटुंबाकडून तिला पाठिंबा मिळाला.