टेरेन्सच्या `त्या` व्हिडिओवर नोराची प्रतिक्रिया
काही दिवसांपूर्वी टेरेन्सचा एक वादग्रस्त व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
मुंबई : नृत्य दिग्दर्शक आणि रिऍलिटी शो 'इंडियाज बेस्ट डान्सर'चा परीक्षक टेरेन्स लुईस चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी टेरेन्सचा एक वादग्रस्त व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ज्यामध्ये तो अभिनेत्री नोरा फतेहीसोबत गैरवर्तन करत असल्याचं दिसून आलं. या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकेची झोड देखील उठवली. परंतु खुद्द नोरा याप्रकरणी प्रतिक्रिया देत या विषयाला पूर्णविराम दिला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचं फोटोशॉप केल्याचं सांगत तिने टेरेन्सचं समर्थन केलं आहे.
नोरा म्हणाली 'टेरेन्स मी तुझा फार आदर करते. सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारे फोटोशॉप करून मिम व्हायरल केले जातात. मला आनंद आहे की सर्व गोष्टींमुळे तुझ्यावर कोणता परिणाम नाही झाला.' काळजी करू नको हा वेळ देखील निघून जाईल असं मत तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलं आहे.
त्याचप्रमाणे तु आणि गीता माँने सेटवर कायम मला सन्मान दिला. एका परीक्षकाच्या भूमिकेत कायम माझ्यावर प्रेम केलं. माझ्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तुमच्याकडून मला अनेक नव्या गोष्टी शिकता आल्या. असं म्हणत तिने टेरेन्सची पाठराखन केली.
दरम्यान, अभिनेत्री मलायका अरोराला कोरोनाची लागण झाल्यामुळे तिच्या जागी नोरा 'इंडियाज बेस्ट डान्सर' परीक्षकाची धूरा सांभाळत आहे. नोरा कायम तिच्या नृत्य कौशल्यामुळे चर्चेत असते. शिवाय तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.