मुंबई : हल्लीच माधुरी दीक्षितने बॉलिवूडमधील ३३ वर्षे पूर्ण केली.  तीन दशक, एवढं मोठं करिअर आणि एवढी लोकप्रियता मिळवणं हे काही सामान्य कुटुंबातील मुलीसाठी काही शक्य नव्हतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही धकधक गर्ल आजही प्रेक्षकांची खास आहे. आपल्या या ३३ वर्षाच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे माधुरीने दिले आहेत. आणि असंख्य अॅवॉर्ड जिंकलेत.तिला आतापर्यंतच्या हिंदी सिनेमातील योगदानामुळे पद्म श्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे. मात्र, तुम्हाला हे माहित आहे का की, माधुरीच्या एवढ्या यशामध्ये नक्की कोणत्या अभिनेत्याचा हात आहे.... 


माधुरीने आपल्या करिअरची सुरूवात १९८४ साली केली. त्यावेळी 'अबोध' या सिनेमातून तिची खास अशी काही ओळख निर्माण झाली नाही. आणि इथूनच तिचा स्ट्रगल सुरू झाला. आपली ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात माधुरी अनेक छोट्या मोठ्या सिनेमांत काम करताना दिसली. 


शेवटी १९८८ मध्ये माधुरी दीक्षितच्या करिअरमध्ये असा क्षण आला. जिथे तिला स्टारडमचा स्वाद अनुभवता आला. आणि याचं कारण होतं 'तेजाब' सिनेमा. या सिनेमात माधुरी दीक्षित एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूरच्या अपोझिट लीडमध्ये होती. रिलीज होताच हा सिनेमा जबरदस्त हिट झाला आणि माधुरी दीक्षित रातोंरात एक मोठी स्टार झाली. 


माधुरी दीक्षित 'तेजाब' साठी सेकंड चॉईस 


माधुरी दीक्षित अगोदर 'तेजाब' या सिनेमासाठी मिनाक्षी शेषाद्रि असं नावं सुचविण्यात आलं होतं. मात्र कोणत्या तरी खाजगी कामामुळे तिने हा रोल नाकारला. आणि मग तो माधुरी दीक्षितला देण्यात आला. आणि मग याच सिनेमातील अभिनयामुळे माधुरी लाखोंच्या हृदयाची 'धक धक गर्ल' बनली.