South Actor Who Honoured With Guinness World Records : दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी कोनिडेलाचे लाखो चाहते आहेत. तर चिरंजीवी हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता त्याचं चर्चेत येण्याचं कारण खास आहे. ते म्हणजे चिरंजीवीचं नावा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आलं आहे. त्याला भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात यशस्वी कलाकाराचा अवॉर्ड देण्यात आला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी यांनी त्यांना हा सन्मान दिला आहे. त्यासोबत बॉलिवूड अभिनेता आमिर खान देखील तिथे उपस्थित होता. त्यानं 45 वर्षांच्या करिअरमध्ये 156 चित्रपट 537 गाण्यांमध्ये 24,000 पेक्षा जास्त डान्स मूव्स केले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिरंजीवी कोनिडेलाला मिळालेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या सर्टिफिकेटवर लिहिली होतं की भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात यशस्वी अभिनेता/ डान्सर चिरंजीवी उर्फ मेगा स्टार. या सन्मानावर प्रतिक्रिया देत चिरंजीवी यांनी सांगितलं की त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून अशा प्रकारचा पुरस्कार मिळेल असं वाटलं नव्हतं. 


चिरंजीवीच्या डान्सचे लाखो चाहते आहेत. तर आमिर खाननं सांगितलं की हा स्टेज त्यांच्यासोबत शेअर करणं ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि तो स्वत: ला चिरंजीवीचा खूप मोठा चाहता समजतो. इतकंच नाही तर तो म्हणाला की चिरंजीवी हा त्याला त्याच्या मोठ्या भावासारखा आहे. चिरंजीवी यांचा डान्स पाहतो तेव्हा ते इतक्या मनापासून डान्स करतात आणि सगळी एनर्जी लावून डान्स करतात. तर मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डीनं X वर एक पोस्ट शेअर करत चिरंजीवीला शुभेच्छा देत सांगितलं की तेलुगू लोकांसाठी ही गर्वाची गोष्ट आहे. टीपीसीसी अध्यक्ष महेश गौड, मंत्री कोमाटिरेड्डी वेंकट रेड्डी, उत्तम कुमार रेड्डी आणि इतर कलाकारांनी देखील चिरंजीवी यांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. 


बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष के टी रामा रावनं देखील पोस्ट शेअर केली आहे. डेब्यूपासून त्यांनी सगळ्यांच्या मनावर राज्य करत त्यांनी चिरंजीवी गारू पर्यंतचा अविश्वसनीय प्रवास केला. 156 चित्रपट, 537 गाणी, 24,000 डान्स मूव्ह्स आणि अविस्मरणीय आठवणींमधून चिरंजीवीनं लोकांना प्रेरित करत राहणार. 


हेही वाचा : अशोक मामा टीव्ही सीरियलमध्ये दिसणार, दोन दशकांनंतर कमबॅक!


चिरंजीवीला गेल्या वर्षी भारताचा सगळ्यात नागरिक सन्मान पद्म विभूषणानं सन्मानित करण्यात आलं. त्यांनी आधी 2006 मध्ये पद्म भूषणनं सन्मानित करण्यात आलं. असं म्हटलं जातं की त्यांनी 45 वर्षांच्या करिअरमध्ये आणि सगळ्यात लक्ष वेधी गोष्ट म्हणजे 22 सप्टेंबर हा दिवसही तो होता जेव्हा त्यांनी 1978 मध्ये त्यांनी सुरुवात केली होती.