मुंबई :  'कांतारा' (Kantara) सध्या कलाजगतामध्ये याच एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रटातील कलाकारांपासून ते अगदी त्यातील गाणी आणि कथानकापर्यंत प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. जागतिक स्तरावर या चित्रपटाती कमाई आता 250 कोटींच्या घरात पोहोचली आहे (Kantara box office collection). अवघ्या 15 कोटी रुपयांच्या निर्मिती खर्चासह साकारण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये लेखन, दिग्दर्शन आणि मुख्य अभिनेता अशी तिहेरी भूमिका ऋषभ शेट्टी (rishabh shetty) यानं निभावली आणि पाहता पाहता तो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, अलीकडेच त्याने हा चित्रपट दक्षिणेतील लोकप्रिय दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमारला ऑफर केल्याचा खुलासा केला आहे.


ऋषभ शेट्टीने यूट्यूब चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. त्याने सांगितलं की "मला नेहमीच शिवाची भूमिका करायची होती, परंतु चित्रपटाने मला घेण्याच्या काही महिन्यांपूर्वी, मी पुनीत राजकुमारचा या भूमिकेसाठी विचार केला होता, मी त्याला चित्रपटाची कथा देखील सांगितली."


त्यामुळे चित्रपट करू शकलो नाही
ऋषभने पुढे सांगितलं की, ही गोष्ट ऐकल्यानंतर पुनीत राजकुमार खूप उत्साही झाला, पण दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्यामुळे तो या चित्रपटात काम करू शकला नाही. ऋषभ म्हणाला, "एक दिवस त्याने मला फोन केला आणि सांगितल की, माझ्याशिवाय चित्रपट कर, जर तू माझी वाट पाहिलीस तर तू या वर्षी हा चित्रपट करू शकणार नाहीस."


मृत्यूच्या दोन दिवस आधी झाली मिटींग
पुनीत राजकुमारच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी 'बजरंगी 2' चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये त्याची भेट झाल्याचंही ऋषभ शेट्टीने यावेळी सांगितलं. ऋषभ म्हणाला, "त्यावेळी त्याने मला कांताराबद्दल विचारलं होतं, मी त्याला शूटचे काही फोटोही दाखवले, त्याने माझ्या चित्रपटाबद्दल आनंद व्यक्त केला आणि तो हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक होता."


विशेष म्हणजे 29 ऑक्टोबर 2021 रोजी पुनीत राजकुमारने हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.