Notice To Netflix Because Of Big Band Theory Madhuri Dixit Scene : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचे (Madhuri Dixit) आजही लाखो चाहते आहेत. माधुरीनं तिच्या अभिनय आणि डान्सनं प्रेक्षकांची मने जिंकली. माधुरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. माधुरीच्या सौंदर्याविषयी तर आजही प्रेक्षक बोलताना दिसतात. दरम्यान, राजनीतिक विश्लेषकांनी 'बिग बैंग थ्योरी' (Big Band Theory) च्या एका एपिसोडवरून नेटफ्लिक्स कंपनी नेटफ्लिक्सला एक नोटीस पाठवली आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या एका एपिसोडमध्ये माधुरी दीक्षित विषयी असं काय म्हणाले की चक्क त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. तर 'बिग बँग थिअरी ' च्या या एपिसोडमध्ये माधुरीविषयी बोलताना 'आक्षेपार्ह शब्द' वापरले आहेत. त्यामुळे आता माधुरीचे चाहते सुद्धा त्यांना पाठिंबा देत आहेत.  


काय आहे हे संपूर्ण प्रकरण? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बिग बँग थिअरी ' च्या दुसऱ्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये जिम पार्सन्स ज्यानं शेल्डन कपूरची भूमिका आणि कुणाल नायरनं साकारलेल्या राज कुथरापल्लीच्या भूमिकेनं माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या रायची (Aishwarya Rai) तुलना केली आहे. डायलॉग बोलत ते जीममध्ये बोलतात की ऐश्वर्या ही गरीबांची माधुरी दीक्षित आहे. त्यानंतर राज कुथरापल्लीची भूमिका साकारणारा कुणआर नायर म्हणाला, 'ऐश्वर्या राय देवी सारखी आहे तर तिच्या तुलनेत माधुरी ही  Leprous Prostitute आहे.'



हे पाहता मिथुन विजय कुमारनं नेटफ्लिक्सला नोटीस पाठवली आहे. मिथुन म्हणाले की जर कंपनीनं या नोटीसवर उत्तर दिलं नाही किंवा मग त्यात दिलेल्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 


हेही वाचा : त्यांच्या राजकारणाला मी थकले; Priyanka Chopra चं बॉलिवूड सोडण्यावर मोठं वक्तव्य


नेटफ्लिक्सला पाठवलेल्या नोटीसचा फोटो ट्विटरवर शेअर करत मिथुन विजय कुमार म्हणाले, 'अलीकडेच मी नेटफ्लिक्सवर बिग बँग थिअरी या शोचा एक भाग पाहिला, ज्यामध्ये कुणालच्या भूमिकेनं बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्रीविषयी अपमानास्पद शब्द वापरला होता. लहानपणापासूनच माधुरी दीक्षितचा फॅन असल्याने डायलॉग ऐकल्यानंतर मला खूप वाईट वाटले. यामुळे त्यात भारतीय संस्कृती आणि महिलांचा अत्यंत अनादर झाल्याचे वाटले. म्हणून मी माझ्या वकिलाला नेटफ्लिक्सला कायदेशीर नोटीस पाठवण्यास सांगितले आणि त्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून हा भाग काढून टाकण्याची विनंती केली. मीडिया कंपन्यांनी बनवलेल्या या कंटेंटसाठी त्यांना जबाबदार ठरवलं आहे आणि मला आशा आहे की नेटफ्लिक्स इंडिया या सगळ्याला गंभीरतेनं घेईल.'