Priyanka Chopra Talk On Bollywood Politics : देसी गर्ल आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आज फक्त बॉलिवूड नाही तर हॉलिवूडमध्येही लाखो चाहते आहेत. प्रियांकानं बॉलिवूडमध्ये यश मिळवल्यानंतर हॉलिवूडकडे तिची वाटचाल सुरु केली होती. पण प्रियांकानं बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असताना हॉलिवूडकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. असा प्रश्न नेहमीच अनेकांना असतो. बऱ्याचवेळी तिच्या चाहत्यांनी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. आता प्रियांकानं तिच्या चाहत्यांना असलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. प्रियांकाच्या उत्तरानं सगळ्यांना आश्चर्य झाले आहे.
प्रियांका सध्या तिच्या 'सिटाडेल' (Citadel) या तिच्या सीरिजमुळे चर्चेत आलं आहे. नुकतीच प्रियांकानं डेक्स शेफर्ड या पॉडकास्टमध्ये शो ‘आर्मचेयर एक्सपर्ट’ वर तिच्या या निर्णयावर वक्तव्य केलं आहे. तिच्या वक्तव्यानं सगळ्यांनाच धक्का बसला आहे. बॉलिवूड सोडण्याचं कारण सांगत प्रियांका म्हणाली की मला जसं काम हवं होतं तस मला मिळत नव्हतं आणि जे मिळत होतं ते तिला आवडत नव्हतं.'
बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये येण्यावर जेव्हा प्रियांकाला प्रश्न विचारला तर आधी प्रियांका थोडी शांत झाली आणि म्हणली, ‘देसी हिट्स’ च्या अंजली आचार्यनं तिला एका म्युजिक व्हिडीओमध्ये पाहिले आणि फोन केला. त्यावेळी प्रियांका सात खून माफ या चित्रपटासाठी काम करत होती. तेव्हा अंजलीनं तिला विचारलं की तिला हॉलिवूडमध्ये म्युझिक करियर करायचं आहे का?'
हेही वाचा : 'मला रात्री कॉफी प्यायला बोलावले...', Ravi Kishan यांनी सांगितला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव
प्रियांका पुढे म्हणाली, 'हे ऐकताच समोरून आलेली संधी मी सोडली नाही. मी लगेच होकार दिला कारण तेव्हा मला बॉलिवूडमध्ये कॉरनर करण्यात येत होते. लोक मला कास्ट करत नव्हते. मला त्या लोकांच्या काही सवयी आवडत नव्हत्या. त्यांच्यासारखं मला ते गेम्स खेळायला जमत नाही. अशा सगळ्या राजकारणाला मी थकले होते आणि मला एका ब्रेकची गरज होती. त्याचवेळी समोरून म्युझिक व्हिडीओच्या आलेल्या या संधीनं मला दुसरं जग पाहता आलं.'
पुढे प्रियांका म्हणाली, 'आता वेगळं काम करायचं म्हटल्यानंतर मला माहित होतं की मला खूप मेहनत करावी लागेल. ही ऑफर मिळाल्यानंतर तुला जे हवं ते करायलं मिळेल असं म्हणतं मी अमेरिकेला गेले.'