मुंबई :  अभिनेत्री श्रीदेवी आणि त्यांचे पती बोनी कपूर यांच्या नात्याच्या चर्चा कायम रंगतात. श्रीदेवी या  बोनी कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. बोनी कपूर यांचं पहिलं लग्न मोनी शौरी यांच्यासोबत झालं. पण कालांतराने बोनी कपूर यांच्या मनात श्रीदेवी यांनी घर केलं. प्रेमासाठी ते त्यांच्या पत्नीपासून दूर झाले. बोनी कपूर आणि मोनी शौरी यांना दोन मुलं आहेत. अभिनेता अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर. बोनी कपूर यांनी दुसरं लग्न केल्यानंतर त्यांचं पहिलं कुटुंब त्यांच्यापासून दूर झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान अनेक  वर्षांनंतर अर्जुनने वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. एका मुलाखती दरम्यान अर्जुन म्हणाला, 'अखेर मी  समजू शकतो की कशाप्रकारे माझे वडिल श्रीदेवी यांच्या प्रेमात पडले. पण मी असं देखील म्हणू शकत नाही माझ्या कुटुंबासोबत जे झालं ते ठिक होतं. प्रेम फार कठीण असतं आणि 2021 आपण जर प्रेम एकदाचं होतं, असं म्हणतं असू तर हा मुर्खपणा ठरेल.'


अर्जुन पुढे म्हणाला, 'प्रेम एक कोडं आहे. प्रेम कायम प्रेमाबद्दल होत नाही. अशा वेळेस मन निराश होतं जेव्हा लोकं जीवनाच्या वेग-वेगळ्या परिस्थितींचा सामना करत असतात. मी नाही म्हणत माझ्या वडिलांनी जे केलं ते योग्य होतं. मी आता समजू शकतो प्रेमात पडणं कसं असतं. मी आता त्यांना पाहात आहे ते कशा प्रकारे परिस्थितींचा सामना करतात.'.


अर्जुन कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरचं अभिनेत्री रकुलरप्रीत सिंगसोबत 'सरदार ऑफग्रँडसन' चित्रपटात झळकणार आहे. त्याशिवाय अर्जुन 'भूत पुलिस' आणि वो 'एक विलेन रिटर्न'  या चित्रपटांमध्ये देखील झळकणार आहे.