मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. चीनच्या वुहानमधून पूर्ण जगात पसरलेल्या कोरोनाव्हायरसमुळे जगभरातील १लाख ७० हजार ७४० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनमध्ये उदयास आलेल्या या व्हायरसने हजारो नागरिकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे नारिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संपूर्ण जगात उद्भवलेल्या महामारीला चीन दोषी असल्याचं वक्तव्य अभिनेता केआरकेने केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तो  म्हणाला, 'चिनी नागरिकांमुळे निर्माण झालेल्या विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. मी चिनी नागरिकांना विनंती करतो, आता तरी उंदीर, मांजर, साप, विंचू, पाल, कुत्रा खाणं कृपया थांबवा. आमच्यावर फारच उपकार होतील.' अशा आशयाचं ट्विट त्याने केले आहे. 



कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या राज्यात वाढताना दिसत आहे. नुकताच राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४२वर गेली आहे. तर पुण्यात आणखी एक कोरोना रूग्ण अढळला आहे. महाराष्ट्रतील शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे. त्य़ामुळे सर्वत्र खबरदारी बाळगण्यात येत आहे. 


शिवाय सरकारही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस पाऊलं उचलत आहे. शिवाय नागरिकांनी देखील स्वत:ची काळजी घेणं तितकचं महत्त्वाचं आहे.