मुंबई : टीव्हीवरील नागिन म्हणून लोकप्रिय असलेली मौनी रॉय हिने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये मौनी बादशाहो सिनेमातील 'मेरे रश्क-ए-कमर' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्यावर मौनी इतका सुंदर डान्स करत आहे की, तुम्ही देखील विसरून जाल की या गाण्यावर या अगोदर अजय देवगन आणि इलियाना डिक्रूज यांनी परफॉर्म केलं आहे. मौनी ने या गाण्यावर डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. मौनीचा हा व्हिडिओ भरपूर प्रमाणात व्हायरल होत आहे. मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर वेगवेगळे फॅन पेज आहेत. तिथे हा व्हिडिओ शेअर केला आहे. तुम्ही देखील मौनीचा हा डान्स व्हिडिओ पाहिलात तर तुम्ही देखील नजर हटवू शकत नाही. 



हल्ली मौनी अक्षय कुमारच्या सिनेमा 'गोल्ड'च्या शुटिंगमध्ये बिझी आहे. आणि सिनेमात अक्षय कुमारसोबत मौनी आता दिसणार आहे. हा मौनीचा पहिला सिनेमा आहे. त्यामुळे ती खास उत्सुक आहे. या व्हिडिओमध्ये मौनी बसून डान्स करत आहे. तिचे हाव भाव आणि तिची नजाकत पाहण्यासारखी आहे.