Ira Khan Wedding Card: अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान हिची सध्या जोरात चर्चा रंगलेली आहे. लवकरच ती विवाहबंधनात अडकणार असून गेल्या काही दिवसांपासून तिच्या केळवणाचे फोटो व्हायरल होत आहेत. ज्यात आयरा ही मराठीतून उखाणा घेताना दिसत होती. तिच्या मराठी उखाण्याचे कौतुकही झाले होते. लवकरच ती आपला बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसह लग्न बंधनात अडकेल. सध्या तिच्या लग्नाचे हटके वेडिंग कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होतंय. आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून एक व्हिडीओ आयरानं शेअर केला आहे. हे वेडिंग कार्ड पाहून नेटकऱ्यांनी नानातऱ्हेच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुपूर शिखरे आणि आयरा खान गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचे समजते आहे.गेल्या वर्षापासून त्या दोघांची जोरात चर्चाही रंगलेली पाहायला मिळाली. त्यांचा साखरपुडाही पार पडला असून साखरपुड्याचे फोटोही तूफान व्हायरल झाले होते. आपल्यापैंकी प्रत्येकाचीच हीच इच्छा असते की आपल्या लग्नाचं आमंत्रणचं इतके हटके आणि वेगळं असावं की आमंत्रितांना लग्नात आल्याशिवाय पर्याय राहणार नाही. सध्या आयरा खानच्या हटके लग्नपत्रिकेनं सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.


तिनं शेअर केलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की आपल्या खास मित्रमैत्रिणींना लग्नाचे आमंत्रण दिले आहे. हटके लग्नपत्रिका पाहून तिचे मित्रही आवाक झाले आहेत. लग्नपत्रिका पाहून तेही सरप्राईज झाले आहेत. यावेळी तिनं पझल पद्धतीची लग्नपत्रिका म्हणून पाठवली आहे. पझल जुळवल्यानंतर त्यांना आयरा आणि नुपूरची लग्नपत्रिका त्यात दिसेल. 


हेही वाचा : रोमॅण्टिक, अ‍ॅक्शन नाही तर अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज' नेटफ्लिक्सवर नंबर 1 क्रमांकावर


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आयरा खान हिनं आपल्या डिप्रेशनविषयी अनेकदा मतं मांडली आहेत. त्याचसोबत यासाठी ती अनेकांना मदत करते आणि याबाबत जनजागृतीही करते. नाटकांमध्येही ती सक्रिय आहे. सध्या तिचा भाऊ जुनैद खान याचीही चर्चा आहे. त्याचे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळेच आवाक झाले आहेत. सोबत तो साई पल्लवी या दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेत्रीसह स्क्रीन शेअर करणार असल्याचेही समजते आहे. काही दिवसांपुर्वी चेन्नईला स्थिरावलेल्या आमिर खानची मिचौंग चक्रीवादळामुळे आलेल्या पुरातून सुटका झाली. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.