Nusrat Fateh Ali Khan Unknown Facts : या गायकाच्या वडिलांना वाटत होतं आपला मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर बनावं. पण त्यांना गायक बनलायचं होतं. दीर्घकाळ सुरांवरील त्यांची अद्भुत आणि आश्चर्यचकित करणारी पकड पाहून प्रत्येक जण अवाक् व्हायचे. त्यांनी अभिनेता ऋषी कपूरच्या लग्नात तब्बल 9 तास सलग गायन केलं होतं. त्यावेळी त्यांची आवाजाच्या जादूने अख्खी सिनेसृष्टी मंत्रमुग्ध झाली होती. या कार्यक्रमासाठी ते खास पाकिस्तानातून मुंबईत आले होते. (nusrat fateh ali khan death anniversary khayal rishi kapoor marriage  ar rahman fan nusrat fateh ali khan  unknown facts in marathi )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संगीत, कला यांना कधीच सीमा आड आणली नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये असे अनेक कवी, गायक आणि कलाकार आहे जे कधी सीमावादात अडकले नाहीत. त्यातील एक नाव होतं नुसरत फतेह अली खान. त्याचा आवाजाच्या जादूने भारतीयांना वेड लावलं होतं. आज ते आपल्यामध्ये नाहीत पण त्यांच्या आवाजाची जादू आजही कमी झालेली नाही. 16 ऑगस्ट 1997 साली त्यांनी जगाचा निरोप घेतला. (Nusrat Fateh Ali Khan Death Anniversary)



घरात कव्वालीचं वातावरण असूनही...


खरं तर नुसरत फतेह अली खान हे फाळणीचे शिकार झाले. ते फाळणीपूर्वी भारताताली जालंधरमध्ये राहत होते. त्यांचे वडील फतेह अली खान साहब त्या काळीतील सर्वोत्कृष्ट कव्वाल होते. त्यामुळे घरात नेहमी कव्वालीच्या मैफली रंगायच्या. पण तरीदेखील त्यांना गुपचूप हार्मोनियम वाजवायला शिकाव लागलं. 


नुसरत अली खान यांचे खरे नाव परवेझ होतं. एका सुफी संताने त्यांचं नाव बदलण्यास सांगितलं. घराच्या प्रगतीसाठी त्यांचं नाव नुसरत म्हणजे यशाचा मार्ग असं ठेवण्यात आलं. तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की, त्यांचा वडिलांना नुसरत यांना डॉक्टर किंवा इंजिनियर बनवायचं होतं. कारण त्यांच्या पाच मुलांपैकी सर्वात लहान नुसरत हे अतिशय लाजाळू होते. त्यामुळे वडिलांना वाटलं ते कव्वालीचा भार आपल्या खांद्यावर उचलू शकणार नाही. 



एका फतेह अली खान यांनी नुसरत यांना तबला वाजवताना पाहिले. यानंतर कुटुंबीयांच्या समजूतीवरून त्यांनी नुसरत यांना कव्वाल बनण्याची परवानगी दिली. हळूहळू नुसरत साहेबांची मेहनत रंगली आणि त्यांचा आवाजाने सर्वांच्या हृदयाचे ठोके चुकवले. (nusrat fateh ali khan death anniversary khayal rishi kapoor marriage  ar rahman fan nusrat fateh ali khan  unknown facts in marathi )


हेसुद्धा वाचा - सेलिब्रिटी कुटुंबातील 'या' हसऱ्या मुलाचा आज 53 वा वाढदिवस! तब्बल 12 वर्षांनी मोठ्या मुलीशी लग्न आणि...


ए.आर. रहमानला तासनतास रांगेत राहाव लागलं उभं 


ए.आर. रहमानला त्यांचा मित्र सारंगने एक सीडी दिली. त्यावेळी रहमानला माहिती नव्हती ती कोणाची सीडी आहे. पहिल्यांदाच त्यांनी दमा दम कलंदरचे बोल ऐकलं आणि तो या आवाजाने घायाळ झाला. या गायकाला भेटायचं असं ए.आर. रहमानने ठरवलं. एकदा एआर रहमान एका अल्बमच्या निमित्ताने न्यूयॉर्कला गेले होते. तेव्हाच कळलं की नुसरत फतेह अली खान साहेबही तिथे आहेत. मग काय त्यांचं गाण ऐकण्याचा मोह रहमानला आवरला नाही. स्टेडियमधील गर्दी पाहून रहमान अवाक् झाला. 



कार्यक्रम झाल्यानंतर ए आर रहमान नुसरजींना भेटण्यासाठी बॅकस्टेजवर गेले. पण त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी त्यांना तासनतास रांगेत राहाव लागलं होतं. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या भेटीत एआर रहमान यांनी त्यांच्याकडे संगीत शिकण्याची इच्छा बोलून दाखवली होती. पण नुसरत यांनी साफ नकार दिला होता. पण पुढे जाऊन रहमान आणि नुसरत फतेह अली खान यांनी 'मां तुझे सलाम'आणि 'चंदा सूरज लाखों तारे' या गाण्यात एकत्र काम केलं. 



शेवटचं गाण त्यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी प्रदर्शित


नुसरत फतेह अली खान यांना किडनी आणि लिव्हरचा त्रास होता. त्यांना किडनी प्रत्यारोपणासाठी लॉस एंजेलिसला नेताना त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना लंडनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 16 ऑगस्ट 1997 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. 2000 मध्ये रिलीज झालेल्या धडकन चित्रपटातील 'दुल्हे का सेहरा सुहाना लगता है' हे गाणे नुसरतजी यांचं शेवटचं गाण होतं.



त्यांच्या जाण्यानंतर तीन वर्षांनंतर हे गाणं वापरण्यात आलं होतं.