Nussrat Jahan Viral Video : टीएमसीची महिला खासदार आणि बंगाली ब्यूटी नुसरत जहाँ (Nussrat Jahan) तिच्या अभिनयासह बोल्ड स्टाइलमुळे खुप चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडिओची खुप चर्चा रंगत असते. आता तिचा बोल्ड व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ती तिच्या बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे. नेमकं या व्हिडिओत काय आहे, ते जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुसरत जहाँने (Nussrat Jahan) तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नुसरत वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये स्वतःला आरशात पाहत आहे. शेवटी तिला तिचा आवडता ड्रेस मिळतो आणि ती तयार होते. नवीन वर्षानिमित्त तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.  


व्हिडिओत काय? 


नुसरत जहाँ (Nussrat Jahan) तिच्या घरातील भिंतीवर टांगलेल्या आरशासमोर उभी आहे. या आरशात ती स्वत:च्या आऊटफिटमधले विविध ड्रेस पाहत आहे.यातील तिला जो ड्रेस आवडतो त्या ड्रेसवर ती क्लिक करते आणि परीधान करते. 


नुसरत जहाँने (Nussrat Jahan)  हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या कलरला जुळणारा स्टायलिश बेल्ट या शॉर्ट आउटफिटमध्ये आकर्षण वाढवतो. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना खुप आवडला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनला ती चाहत्यांना प्रश्न विचारते की, नवीन वर्षानिमित्त कोणता ड्रेस परिधान करू? 



दरम्यान नुसरत जहाँने (Nussrat Jahan)  हा व्हिडिओ स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी हार्ट इमोजी पाठवले, तर अनेक सोशल मीडिया यूजर्सनी फायर इमोजी पोस्ट केले. तिच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.