मुंबई : 2021 मध्ये बंगाली राजकारातील एका चेहऱ्याची साऱ्या देशात चर्चा झाली. हा चेहरा म्हणजे खासदार नुसरत जहाँ यांचा. वैवाहिक जीवनातील वादळानंतर त्यांनी एका बाळाला जन्म दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या नुसरत जहाँ या सध्या मातृत्त्वाचा अनुभव घेत आहेत. 


अभिनेता यश दासगुप्ता याच्यासोबत त्या हे क्षण अनुभवत असतानाच आता त्यांच्याबाबत आणखी एर माहिती समोर आली आहे. 


एका मुलाखतीत खुद्द नुसरत यांनीच खुलासा करत नाकाच्या शस्त्रक्रियेबाबतची बाब सांगितली.


आपल्या नाकाचा आकार यामुळं वाढला आहे, कारण शरीरातील काही हार्मोन्स बदलले आहेत.


मी नाकावर शस्त्रक्रिया केलेली नाही. हार्मोनल बदलांमुळे माझ्या नाकाचा आकार वाढला आहे. माझे पायही सुजतात. शरीराचा रंगही बदलतो, असं त्या म्हणाल्या. 


अनेकदा तर, माझ्या शरीराचा रंग एखाद्या झेब्रासारखा दिसतो असं सांगत असतानात आता मी पुन्हा एकदा माझ्या शरीराकडे लक्ष देऊ लागली आहे याबाबतची खात्री त्यांनी दिली. 


मातृत्त्वाचा स्वीकार करणं हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय असल्याचं त्यांनी सांगितलं. 



माझं आयुष्य असल्यामुळं त्याबाबतचा निर्णय घ्यायचा मला पूर्ण हक्क आहे, असं त्यांनी सांगितलं.