मुंबई : देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या स्वातंत्र्यदिनी सर्वसामान्यांपासून कलाकार, खेळाडू सर्वंच तिरंग्यात न्हाहून निघाले आहेत. अशीच बंगाली अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहॉ (Nusrat Jahan)  देखील तिरंग्यात न्हाहून निघाली आहे. या संबंधित व्हिडिओ तिने पोस्ट केला आहे. या व्हिडिओची एकच चर्चा रंगली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगाली अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँने (Nusrat Jahan)  सोशल मीडियावर तिरंगा फडकवतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा तिचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. नुसरत जहाँने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने,'जय हिंद. तुम्हा सर्वांना 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा,असा देशवासियांसाठी मेसेज लिहला आहे.  


व्हिडिओत काय? 
या व्हिडिओमध्ये नुसरत जहाँने (Nusrat Jahan) पांढऱ्या रंगाचा सूट घातला आहे. आणि त्यावर रंगीबेरंगी दुपट्टा परिधान करून तिने तिचे सौदर्य दाखवले आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओच्या मागे 'ए वतन मेरे वतन' हे गाणे वाजत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या घराच्या छतावर स्वातंत्र्यदिन साजरा करताना दिसत आहे. कधी ती तिरंग्याचे फुगे मोकळ्या आकाशात उडवताना दिसली, तर कधी हातात तिरंगा पकडून तो फडकवताना दिसली आहे. 



सोशल मीडियावर ट्रोल
नुसरत जहाँच्या (Nusrat Jahan)  या व्हिडिओवर अनेक युजर्स कमेंट करत आहेत. एका वापरकर्त्याने कमेंट केली आहे की, 'तुम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करत आहात कि तुमचे कपडे आणि दागिने दाखवत आहात. दुसरीकडे, आणखी एका यूजरने कमेंट केली 'आता स्वातंत्र्य दिनाच्या व्हिडिओमध्ये खूप फरक आहे. नेटीझन्सच्या अशा काही कमेंटमुळे ती ट्रोल होताना दिसतेय.