मुंबई : अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगनची लोकप्रियता एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. तिने अद्याप बॉलिवूडच्या दुनियेत पाऊल ठेवलेलं नाही पण सोशल मीडियावर तिचा दबदबा कायम आहे. न्यासा देवगणचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती एका मुलासोबत बागेत बसली आहे. त्यामुळे न्यासासोबत असलेला मुलगा कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सध्या न्यासा आणि तिच्यासोबत असलेल्या मुलाच्या खास फोटोबाबत तुफान चर्चा रंगत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोमध्ये न्यासासोबत असलेल्या मुलाचं नाव फिल्ममेकर दानिश गांधी (Filmmaker Daanish Gandhi) आहे. दानिश नात्याने न्यासाचा भाऊ लागतो. दानिश हा अजय देवगणचा भाचा आहे.



दानिशने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो एका फोटोमध्ये न्यासासोबत दिसत आहे. फोटोमध्ये न्यासा आणि दानिश लंडनच्या हाइड पार्कमध्ये एका झाडाखाली बसलेले दिसत आहेत.


दानिशच्या पोस्टवर लोक कमेंट करत आहेत. अनेक लोक न्यासाच्या स्माईलचे कौतुक करत आहेत. तर काहीजण दोघांनाही क्यूट म्हणत आहेत. एका युजरने लिहिले, "दोघेही क्यूट दिसत आहेत.." दुसर्‍या युजरने इमोजीसह "सुंदर भाऊ आणि बहीण" असं लिहिलं आहे. 


दरम्यान, न्यासाने तिचं इंस्टाग्राम प्रायव्हेट केलं असूनही, न्यासा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप लोकप्रिय आहे. वेळोवेळी न्यासाचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालताना असतात. ती अनेकदा तिच्या मैत्रिणी आणि जवळच्या मित्रांसोबत मस्ती करताना दिसते.