Sushant Singh Rajputच्या आत्महत्येचं रहस्य उलगडणार `हा` चित्रपट; Teaser Out
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी राहत्या घरी गळफास घेत स्वतःचा जीवन प्रवास संपवाला.
मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी राहत्या घरी गळफास घेत स्वतःचा जीवन प्रवास संपवाला. पण त्याच्या मृत्यूनंतर सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली अशा चर्चा जोरदार पसरल्या होत्या. आता त्याच्या आत्महत्येचं रहस्य उलगडणारा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटचं नाव 'न्याय : द जस्टिस' (Nyay : The Justice)असं असून चित्रपटाचा टीझर लाँच झाला आहे. या चित्रपटात झुबेर दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या भूमिकेत दिसणार आहे.
विकास प्रॉडक्शन अंतर्गत साकारण्यात आलेला चित्रपट 'न्याय : द जस्टिस'चा पोस्टर आणि टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाची कथा सुशांतच्या आत्महत्ये भोवती फिरत आहे. सुशांतच्या चाहत्यांना देखील चित्रपटाबद्दल प्रतिक्षा होती. चित्रपटाचा 58 सेंकेंदांचा असून अत्यंत बोलका आहे.
टीझरच्या सुरवातील न्यूज चॅनलवर सुशांतच्या आत्महत्येची ब्रेकिंग न्यूज सुरू असते. त्यानंतर चौकशी. इतरांची आत्महत्या प्रकरणात एन्ट्री इत्यादी घटानांची झलक टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. तर चित्रपटात सुशांतच्या आत्महत्येचं रहस्य उलगडणार आहे.