मुंबई : मराठी इंडस्ट्रीत आतापर्यंत अनेक कलाकार मंडळींनी आपल्याच क्षेत्रातील जोडीदार निवडलाये. अभिनय क्षेत्रात एकत्र ऑन स्क्रिन काम करत असताना अनेकांच्या ऑफ स्क्रिन जोड्या जुळल्या आहेत. आणि या जोड्या अगदी सुखाने संसार करताना दिसतायेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 अभिनेत्री प्रिया मराठे आणि अभिनेता शंतनू मोघे ही देखील त्यापैकीच एक जोडी आहे. प्रियाने आतापर्यंत अनेक सिनेमा, नाटक आणि मालिकांमध्ये काम केली आहेत. तर शंतनुने देखील सिनेमांमध्ये काम केली आहेत. या सेलिब्रिटी जोडीने आजवर अनेकदा स्क्रीनवर एकत्र काम केलं आहेत. पण पहिल्यांदाच ही जोडी ऑनस्क्रीन पती-पत्नीचं पात्र साकारणार आहे.



प्रियाने या संदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 'रिअल हसबंड बने रील हसबंड' असं कॅप्शन प्रियाने या फोटोला दिलंय. यामध्ये प्रियाचा लूक सर्वासाधरण गृहिणी प्रमाणे दिसतोय. तर शंतनूही मध्यमवर्गीय व्यक्तीप्रमाणे दिसत आहे. 


पण अद्याप आगामी प्रोजेक्टचं नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आलंय. प्रिया आणि शंतनू यापुर्वी स्वराज्य रक्षक संभाजी, स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत एकत्र झळकले आहेत. पण ऑनस्क्रीन पती-पत्नी मात्र ते पहिल्यांदाच साकारणार आहेत.