COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : वरूण धवन आणि अनुष्का शर्माच्या 'सुई-धागा : मेड इन इंडिया' या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. वरूण आणि अनुष्का दोघेही या सिनेमातून एका वेगळ्याच अंदाजात समोर येत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन शरत कटारिया यांनी केलं आहे. शरत यांनी या अगोदर यश राज बॅनरचा सुपरहिट सिनेमा 'दम लगा के हईशा' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तशाच प्रकारचा देसी फ्लेवर आपल्याला 'सुई - धागा' या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 


ट्रेलरमध्ये असं दाखवण्यात आलं की, वरूण धवन सिनेमात मौजीचं कॅरेक्टर प्ले करत आहे. जो काहीच नसताना सगळं उत्तम आहे या विश्वासात राहत असतो. त्याची पत्नी ममता म्हणजे अनुष्का शर्मा यांच अरेंज मॅरेज आहे. हे दोघं एकमेकांचे नवरा बायको आहेत पण एकमेकांसोबत वेळ घालवू शकत नाही. 


या सिनेमातून पहिल्यांदाच अनुष्का आणि वरूण धवनची जोडी समोर येत आहे. हा सिनेमा 28 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा 'पटाखा' या विशाल भारद्वाजच्या सिनेमासोबत टक्कर देणार आहे.