मुंबई : ज्येष्ठ पत्रकार विनोद कापडी यांच्या 'पीहू' या सिनेमाचा ट्रेलर आज मेकर्सनी इंटरनेटवर रिलीज केला आहे. सिनेमाचा हा ट्रेलर अंगावर शहारा आणेल. ट्रेलर पाहायला गेल्यावर तुम्हाला अनेक प्रश्न पडतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेलरमध्ये मायरा नावाची एक लहान मुलगी एकटी घरात कैद झाली आहे. या 2 वर्षांच्या मुलीच्या आईचा मृतदेह हा घरातच आहे. आणि या मुलीला याबाबत अजिबात काही माहिती नाही. ही मुलगी कधी किचनमध्ये गॅस पेटवते तर कधी फोन उचलण्यासाठी स्वतःला अगदी धोक्यात टाकतात.  



ट्रेलरच्या शेवटाला दाखवण्यात आलं आहे की, ही पिहू बालकनीत कुणाला तरी आवाज देत असल्याचं दिसून आलं. हे सगळं बघून खूप धक्का बसेल.