मुंबई : बॉलिवूड सिनेमात पदार्पण केलेल्या कॉमेडिअन सुनील ग्रोवरच्या 'पटाखा' या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून हा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या सिनेमात सुनील ग्रोवरसोबतच सान्या मल्होत्रा आणि राधिका मदान देखील एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. सिनेमाचा अफलातून ट्रेलर सध्या भरपूर चर्चेत आहे. सगळ्या कलाकारांनी या ट्रेलरमधून उत्तम काम केल्याचं स्पष्ट होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


हा सिनेमा दोन बहिणींवर आधारित आहे. ज्या एकमेकांना अजिबातच पसंद करत नाही. या दोन्ही बहिणी राजस्थानच्या एका गावात राहणाऱ्या असून एकमेकांशी या सतत भांडत असतात. या ट्रेलरमध्ये आपल्याला सतत हसायला लावत आहे सुनील ग्रोवर. हल्लीच सिनेमातील अनेक पोस्टर्स देखील रिलीज झाले. ज्या पोस्टर्सना सोशल मीडियावर भरपूर पसंती मिळाली. हा सिनेमा 28 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमातून दंगल गर्ल सान्या मल्होत्रा आणि टीव्ही अभिनेत्री राधिका मदान या दिसणार आहेत.