मुंबई : सुखाचं-हक्काचं माहेर सोडून मुलगी एका वेगळ्याच कुटुंबात प्रवेश करते. असं घर जे इथून पुढे तिचं होणार असतं. या प्रवासात तिला पतीची साथ असली तरी एका जिवाभावाच्या मैत्रिणीची तिला कायमच उणीव भासत असते. अशावेळी सासूच जर तिची सखी झाली तर नात्यांचा गोडवा अधिकच वाढतो. आणि घराचं गोकुळ होतं. अशाच एका गोड नात्याची कथा सांगणारी 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका झी मराठीवर आली आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रसिकप्रेक्षकांनी मालिकेला आणि त्यातील नलू मावशी, दादा, चिन्या, शकू मावशी, मालविका, रॉकी ह्या पात्रांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. ‘अन्विता फलटणकर’ आणि ‘शाल्व किंजवडेकर’ ह्या फ्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडलेय. प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्या सोबत सावली सारखा उभा राहणारा ओम या दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. ओम आणि स्वीटूच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर होताना दिसत आहे.



आता ह्याचाच पुढचा टप्पा "तू मी आणि पुरणपोळी" १६ मे ला संध्याकाळी ७ वा. चित्रपट रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. आता काय असणार ह्या तू मी आणि पुरणपोळी मध्ये. थोडी उत्सुकता ताणून ठेवा आणि रविवार १६ मे संध्या.  ७ वा. पाहायला विसरू नका ओम स्वीटू ची लव्हस्टोरी "तू मी आणि पुरणपोळी" फक्त आपल्या झी मराठीवर.