मुंबई : रेमो डिसूझाने बॅक स्टेज आर्टिस्टपासून करियरला सुरूवात केली. आता रेमो केवळ कोरिओग्राफर नाही तर सिनेनिर्माता आणि दिग्दर्शकही झाला आहे. रिएलिटी शोजमधून घराघरात पोहचलेला रेमो आता 'एबीसीडी३'या सिनेमाच्या कामाला लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच पार पडलेल्या 'डान्स प्लस' या शोच्या अंतिमा सामन्यात या चित्रपटाबाबत घोषणा करण्यात आली. या चित्रपटात अभिनेता वरूण धवन झळकणार आहे. यापूर्वी डान्स रिएलिटी शो मधून घरा घरात पोहचलेल्या पुनित पाठक, धर्मेश, युसूफ खान यांच्यासोबत २०१३ साली 'एबीसीडी' हा चित्रपट रसिकांच्या भेटीला आणला. त्यानंतर २०१५ साली श्रद्धा कपूर आणि वरूण धवन यांच्यासोबत 'एबीसीडी२' या चित्रपटाची निर्मिती केली.  या दोन्ही चित्रपटाच्या यशानंतर रेमोने 'एबीसीडी३' चीदेखील घोषणा केली आहे. 


हिंदी सिनेमामध्ये केवळ नृत्यावर आधारित फारसे चित्रपट आले नाहीत. पण रेमोने एबीसीडीच्या सिरीजमुळे ही सारी गणितं बदलली आहेत. 'एबीसीडी३'मुळे पुन्हा नृत्य प्रेमींना  रेमो आणि वरुण या जोडीची कमाल पहायला मिळणार आहे.