मुंबई : पुन्हा एकदा अमिताभ बच्चन आजोबा झाले आहेत? आराध्याचा धाकटा भाऊ आला आहे? बच्चन कुटूंबात आली आनंदाची लाट? या सगळ्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. सुपरस्टार अमिताभ बच्चन पुन्हा दादा बनल्याच्या बातम्या येत समोर येत आहेत. असो अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. ज्यात अमिताभ बच्चन यांनी छोट्या पाहुण्याला आपल्या कडेवर  घेतल्याचं दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच बातमी आली आहे की बच्चन कुटुंबातील एक नवीन सदस्य आला आहे. अमिताभ बच्चन दुसऱ्यांदा आजोबा झाले आहेत. मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्या राय देखील अनेक फोटोंमध्ये एकत्र दिसत आहेत. या बातमीने केवळ बच्चन कुटुंबासाठीच नाही तर त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणी आणि चाहत्यांनाही आनंद झाला आहे. पण हे खरंच घडलं आहे का?  जाणून घेऊया या बातमीमागचं सत्य.


व्हायरल होत असलेल्या फोटो मागचं सत्य काय?
सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांची लाडकी नात आराध्या बच्चन एका गोंडस बाळासोबत खेळताना दिसत आहे. हा फोटो व्हायरल होताच हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून आराध्याचा धाकटा भाऊ आणि ऐश्वर्या अभिषेकचा मुलगा असल्याची अटकळ बांधली जात आहे. ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. पण सत्य हे आहे की फोटोत दिसणारा मुलगा अभिषेक बच्चनच्या चुलत भावाचा मुलगा आहे.



एवढंट नव्हेतर, बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या रायच्या गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा अशा बातम्यांचं खंडन करण्यात आलं आहे. लक्षात घेण्यासारखं आहे की, ऐश्वर्या आई झाल्यानंतर ती अवघ्या काहीच चित्रपटांमध्ये दिसली आहे.