`महाराष्ट्राची हास्यजत्रा` सोडणं लकी की अनलकी? Onkar Bhojane म्हणाला...
Onkar Bhojane ला खरी लोकप्रियता ही `महाराष्ट्राची हास्यजत्रा` या शोमधून मिळाली आणि अचानक त्यानं शो सोडण्याचा निर्णय घेतला... दरम्यान, या सगळ्या प्रकरणानंतर त्याच्या चाहत्यांना प्रचंड वाईट वाटले होते. आता हा शो का सोडला त्यावर ओंकारनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
Onkar Bhojne On Maharashtrachi Hasyajatra : छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा शो प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आहे. या शोमधील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दरम्यान, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता आणि कॉमेडी वीर ओंकार भोजनेनं (Onkar Bhojane ) काही दिवसांपूर्वीच शोला रामराम ठोकला. ओंकारनं शो सोडल्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यानंतर ओंकार एकांकिका देखील करत होता. लवकरच ओंकारचं 'करून गेलो गाव' (Karun Gelo Gava) भन्नाट विनोदी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, ओंकार हा आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ओंकार ‘कलावती’ (Kalaawati) या चित्रपटात दिसणार आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ओंकारनं महाराष्ट्राची हास्यजत्रा शो सोडणं लकी की अनलकी ठरलं यावर वक्तव्य केलं आहे.
'कलावती' हा चित्रपट लोकप्रिय दिग्दर्शक संजय जाधव यांचा आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा ही नुकतीच करण्यात आली होती. चित्रपटाच्या निमित्तानं कलाकारांनी मुलाखत दिली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ओंकारला त्यानं हास्यजत्रा सोडण्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. हास्यजत्रा सोडल्यानंतर तुझे एक एक चित्रपट येऊ लागले आहेत. हास्यजत्रा सोडणं हे अर्थाने लकी किंवा मग अनलकी ठरलं का?” त्यावर उत्तर देत ओंकार म्हणाला, “ या सगळ्या चर्चांमध्ये कोणत्याही प्रकारे तथ्य असल्याचे मला दिसत नाही. खरंतर त्या मंचामुळेच मला ओळख मिळाली अशात तो मंच सोडणं माझ्यासाठी लकी कसं ठरेल? त्यावेळी माझं ते काम होतं आणि त्यानंतर माझ्याकडे आणखी काही काम होती, त्यामुळे मला निघावं लागलं. ती एक वेळ होती त्यामुळे लकी की अनलकी यावर मी विचार केलाच नाही."
हेही वाचा : Anil Kapoor करतायत लक्ष्याला Miss, फोटो शेअर करत म्हणाले...
दरम्यान, जेव्हा ओंकारनं महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा चाहत्यांनी याला विरोध दर्शवला होता. तरी देखील ओंकार त्याच्या निर्णयावर ठाम राहिला त्यानं चाहत्यांना दु:ख झाले होते. आता लवकर ओंकार कलावती चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अमृता खानविलकर व्यतिरिक्त संजय नार्वेकर (Sanjay Narvekar), तेजस्विनी लोणारी (Tejaswani Lonari), हरिष दुधाणे (Harish Dudhade), दीप्ती धोत्रे (Dipti Dhotre) आणि युट्यूबर नील (Neel Salekar ( Infulencer)हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. खरंतर या चित्रपटातून संजय जाधव तब्बल चार वर्षांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.