लॉस एंजेलिस : यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. यंदाचा ९१वा ऑस्कर अनेक कोणत्याही सुत्रसंचालकाशिवाय होत असल्याने खास ठरतो आहे. ऑक्सर म्हटलं की, तो झगमगता, दिमाखदार असाच डोळ्यासमोर येतो. पण केवळ ऑस्कर सोहळाच नाही तर ऑस्करनंतर होणारी आफ्टर पार्टीही तितकीच खास, शानदार आणि चवदार आहे. या पार्टीसाठी खास खाद्यपदार्थ मेजवानी ठेवण्यात आली आहे. यंदा ऑस्करमध्ये सर्वात्कृष्ट म्हणून निवड झालेल्या आठ चित्रपटांच्या नावाने खाद्यपदार्थांची थिम ठेवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोहेमियन रॅपसडी - बोहेमिया बीयर


पार्टी म्हटलं की बीयर आलीच..आणि त्यात अशा शानदार सोहळ्यात एखाद्या चित्रपटाच्या नावाने असणारी बीयरही तितकीच खास आहे. बोहेमियन रॅपसडी या चित्रपटाच्या नावाने बीयरमध्ये बोहेमिया बीयर अशी थिम ठेवण्यात आली आहे. ही मॅक्सिकन बीयर आहे. 


ब्लॅक पॅन्थर - व्हायब्रॅनियम पंच


ब्लॅक पॅन्थर चित्रपटातील वाकांडा हे काल्पनिक शहर असून वाइब्रॅनियम हादेखील एक काल्पनिक धातू आहे. पण या काल्पनिक जगातील ब्लॅक पॅन्थर चित्रपटाच्याआधारे ऑस्करच्या पार्टीत 'व्हायब्रॅनियम पंच' हे पेय ठेवण्यात आले आहे. टॉनिक वॉटर, स्प्राईट, वोडका, द्राक्षं, आणि बर्फ या घटकांच्या आधारे जांभळ्या रंगाचं हे खरंखुरं पेय खास ऑस्कर पार्टीसाठी बनवण्यात आलं आहे.


द फेवरेट - मार्शमेलो पीप बनीज 


द फेवरेट चित्रपटात महाराणी अॅनीचे १७ ससे दाखवण्यात आले आहे. ते ससे तिच्या मृत मुलांचे प्रतिनिधित्व करतात. चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात आलेल्या एका कथानकाच्या आधारे मार्शमेलो पीप बनीज पदार्थ ठेवण्यात आला आहे. परंतु चित्रपटात दाखवण्यात आलेल्या सशाप्रमाणे मार्शमेलोचा आकार नसून त्यात बदल करण्यात आला आहे. परंतु ऑस्करच्या पार्टीत ठेवण्यात आलेल्या या पदार्थाने मात्र चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे.


ग्रीन बुक - पिझ्झा


ग्रीन बुक चित्रपटात दोन मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात फ्राईड चिकन आणि एका मोठ्या पिझ्झाच्या स्लाईसबाबत कथानक आहे. ग्रीन बुक चित्रपटाच्याआधारे ऑस्करमध्येही अशाच प्रकारचा पिझ्झा ठेवण्यात आला आहे. 


रोमा - तुर्की टोर्टा


१९७० मधील मेक्सिको सिटीत राहणाऱ्या एका सामान्य घरातील आश्चर्यकारक चित्रण रोमा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. मेक्सिकोतील तुर्की टोर्टा हा लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. त्याच्याच आधारे ऑस्करमध्ये तुर्की टोर्टा हा पदार्थ ठेवण्यात आला आहे.


अ स्टार इज बॉर्न - मेन लॉबस्टर रोल्स


अ स्टार इज बॉर्न चित्रपट काल्पनिक जॅकसन मेन संगीतकाराच्या जीवनावर आधारित आहे. त्या चित्रपटातील जॅकसन मेन नावाच्या पात्राच्या आधारे मेन लॉबस्टर रोल्स हा पदार्थ ऑस्करमध्ये ठेवण्यात आला आहे.


OSCARS 2019 जितका शानदार असतो तितकीचं ऑस्करची आफ्टर पार्टीही मजेशीर असते. ऑस्करच्या आफ्टर पार्टीत चित्रपटाच्या नावाने विविध खाद्यपदार्थ ठेवण्यात आलेत. अशाप्रकारे विविध चित्रपटांच्या नावाने ठेवण्यात आलेल्या पदार्थांनी ऑस्करमध्ये नामांकन मिळवलेल्या चित्रपटांची उत्सुकता वाढवली. यंदाचा ऑस्कर २०१९ जितका जितका रंगतदार ठरला तितकीची त्याची आफ्टर पार्टीही चवदार ठरेल यात शंका नाही.