अॅकॅडमीOscar 2024 : भारतात कधी आणि केव्हा बघू शकता ऑस्करचे लाइव्ह नॉमिनेशन्स?
यंदाच्या वर्षी 23 कॅटेगरीमध्ये नॉमिनेशनची घोषणा करण्यात आली आहे. कधी आणि केव्हा ऑस्कर 2024 चे लाईव्ह नॉमिनेशन्स पाहू शकता.
दरवर्षी प्रेक्षक जगातील चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार 'ऑस्कर'ची आतुरतेने वाट पाहत असतात. अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने अलीकडेच पुरस्कार सोहळ्याच्या 96 व्या आवृत्तीची घोषणा केली आहे. अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस आणि ABC यांनी घोषित केले की 96 वा ऑस्कर रविवारी, 10 मार्च 2024 रोजी होणार आहे. हा शो ओव्हेशन हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. यावर्षी या पुरस्कारासाठी 23 श्रेणींमध्ये नामांकने जाहीर केली जाणार आहेत. जाणून घेऊया ऑस्कर अवॉर्ड्सचे लाइव्ह नॉमिनेशनचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहू शकता.
ऑस्कर नामांकन थेट Live Nominations?
अॅकॅडमीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाईल. ते Oscar.com आणि Oscar.org वर देखील पाहता येईल. म्हणजेच, तुम्ही अॅकॅडमीच्या www.oscars.org/how-to-watch या अधिकृत वेबसाइटवरही नामांकन पाहू शकता. प्रेक्षकांना आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून ऑस्कर नामांकनांचे थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहता येईल.
भारताला एकही नामांकन मिळाले नाही
यावर्षी, '2018' हा चित्रपट भारताने ऑस्कर 2024 साठी पाठवला होता, परंतु हा चित्रपट टॉप 15 शॉर्ट लिस्टमध्ये स्थान मिळवू शकला नाही. महत्त्वाचं म्हणजे निवड झालेल्या 15 सिनेमांपैकी फक्त 5 चित्रपट ऑस्करसाठी निवडले जाणार आहेत. नामांकनासाठी मतदान 11 जानेवारीला सुरू झाले आणि 16 जानेवारीला बंद झाले.
क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स आणि गोल्डन ग्लोब्सच्या विजेत्यांना पाहता, बहुतेक नामांकने ख्रिस्तोफर नोलनच्या 'ओपेनहायमर' आणि ग्रेटा गेर्विगच्या 'बार्बी'ला जातील असे मानणे योग्य आहे. मार्टिन स्कोर्सेसचे 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून' आणि 'एम्मा स्टोन-स्टार पुअर थिंग्ज' हे देखील प्रतिष्ठित ट्रॉफीचे दावेदार आहेत.
15 सिनेमांची यादी
1. अमेरिकात्सी(आर्मेनिया)
2. द मॉन्क एंड द गन, The Monk and the Gun (भूटान)
3. द प्रॉमिस्ड लैंड, The Promised Land (डेनमार्क)
4. फॉलेन लीव्स, Fallen Leaves (फिनलैंड)
5. द टेस्ट ऑफ थिंग्स, The Taste of Things (फ्रांस)
6. द टीचर्स लाउंज, The Teachers’ Lounge (जर्मनी)
7. गॉडलँड, Godland (आइसलैंड)
8. आईओ कैपिटानो, Io Capitano (इटली)
9. परफेक्ट डेज़, Perfect Days (जापान)
10. टोटेम, Totem (मेक्सिको)
11. द मदर ऑफ ऑल लाइज, The Mother of All Lies (मोरक्को)
12. सोसाइटी ऑफ़ द स्नो, Society of the Snow (स्पेन)
13. फोर डॉटर्स, Four Daughters (ट्यूनीशिया)
14. 20 डेज इन मारियुपोल, 20 Days in Mariupol (यूक्रेन)
16. द जोन ऑफ इंट्रेस्ट, The Zone of Interest (यूनाइटेड किंगडम)