Oscars 2023: चित्रपटसृष्टीमध्ये सर्वांत मानाचा सजमला जाणारा पुरस्कार म्हणजे 'ऑस्कर'. फक्त भारतातच नाही तर जगभरातील अनेक कलाकार या पुरस्कार (Oscar Awards 2023) सोहळ्याची आतुरतेनं वाट पाहत असतात. कोणाला पुरस्कार मिळणार याची जोरदार चर्चा देखील सुरू असते. अशातच आता यंदाचा 'ऑस्कर पुरस्कार सोहळा' लवकरच पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार 13 मार्च रोजी सकाळी साडेपाच वाजता ऑस्कर सोहळा लाईव्ह टेलिकास्ट (Oscar ceremony live telecast) करण्यात येईल. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, तुम्हाला माहितीये का? की ऑस्कर जिंकल्यानंतर ट्रॉफी (Oscar trophy) विकू का शकत नाही. त्याचं कारण काय? जाणून घ्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्कर मिळाला म्हणजे लय मोठं पैसा मिळाला असणार असा एक समज असतो. ऑस्कर हा सर्वात मौल्यवान पुरस्कार मानला जातो आणि त्याला एक मान आहे. मात्र, त्याने नियम देखील तेवढेच कडक आहेत. अवॉर्ड विकला तर मोक्कार पैसा मिळेल, असा समज असतो. मात्र, असं नाही. कोणत्याही कलाकाराला कोणत्याही परिस्थितीत ऑस्कर अवॉर्ड विकता येत नाही.


ऑस्कर पुरस्काराला एक मान आहे. म्हणूनच हा पुरस्कार कोणी विकू शकत नाही. त्याची स्वतःची खासियत आहे आणि त्यामुळे या पुरस्काराबाबत कडक नियम आहेत. जर कोणी ऑस्कर पुरस्कार विकला तर त्याला किती पैसे मिळतील? असा सवाल अनेकदा विचारला जातो.


ऑस्करची ट्रॉफी (Oscar Awards)


सोनेरी रंगाची जरी दिसली तरी ही ऑस्करची ट्रॉफी सोन्याची नसते. खरंतर, ऑस्कर पुरस्कार ब्राँझचा असतो. ज्यावर 24 कॅरेट सोन्याचा थर दिला जातो. त्यामुळे ट्रॉफी अधिक निखारून दिसते. त्याची किंमत पण खूप कमी आहे.


ऑस्करची ट्रॉफीची किंमत असते? (Price Of Oscar Awards)


ऑस्कर पुरस्कार तयार करण्यासाठी एक हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 82 हजार रुपये खर्च येतो. ही ट्रॉफी 13.5 इंच लांब आणि 450 ग्रॅम वजनाची असते. मात्र, नियमांनुसार हा पुरस्कार कलाकार विकू शकत नाही. त्याला कारण आहे ऑस्करचे कडक नियम.


काय आहे नियम?


चित्रपटसृष्टीमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळे त्याचा एक स्टॅन्डर्ड सेट केलेला आहे. हा पुरस्कार काही मोजक्याच लोकांच्या नशिबात असल्याने याला पैशात मोजता येत नाही. जर ऑस्कर विजेत्याने आपला पुरस्कार विकण्याचा प्रयत्न केला, तर त्या कलाकाराला अकादमीच्या कायदेशीर संघाकडून कारवाईला सामोरं जावं लागेल. जर एखाद्या कलाकाराला पुरस्कार विकायचाच असेल तर तो पुरस्कार फक्त ऑस्कर अकादमीला (Oscar Academy) विकता येतो. त्यासाठी त्याला फक्त 10 डॉलर म्हणजेच 820 रुपये मिळतील.



दरम्यान, 82 हजाराची ट्रॉफी फक्त 820 रुपयांमध्ये विकली जाऊ शकते. हा पुरस्कार देणं म्हणजे पैश्यात तुलना न करता कलागुणांना वाव देणं हा उद्देश आहे. 95 व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिला देखील विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. आरआरआर  चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला  (Natu Natu Song Oscar) नामांकन मिळालं असल्याने सर्वांच्या नजरा सध्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर आहे.


आणखी वाचा - Oscar Award 2023: अन् सलग एक मिनिट मिळालेलं स्टॅडिंग ओवेशन, टाळ्यांचा कडकडाट ऐकून चार्ली चॅपलिन यांचे डोळे पाणावले 'तो' क्षण!


कुठे पाहाल LIVE Oscar Awards 2023?


13 मार्च रोजी सकाळी साडेपाच वाजल्यापासून या पुरस्कार सोहळ्याला सुरुवात होणार आहे. ABC नेटवर्क या चॅनेलवर हा पुरस्कार सोहळा दाखवण्यात येईल. त्याचबरोबर काही यूट्यूब चॅनेलवर हा सोहळा लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. Hulu + Live TV, Sling TV, YouTube TV किंवा Fubo वर देखील सोहळा दाखवला जाणार आहे.