मुंबई : 90 व्या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्याला सुरूवात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक दिग्गजांचा या यादीत समावेश आहे. दरवर्षी अनेक चाहते आणि सिनेमाशी जोडल्या गेलेल्या लोकांना उत्सुकता असते की कोणत्या सिनेमाला बेस्ट फिल्मचं अवॉर्ड मिळालं आहे. किंवा कोण आहे बेस्ट अभिनेता आणि अभिनेत्री. 'द अॅकडमी अवॉर्ड्स' हा सर्वात मोठा मान समजला जातो. 


ऑस्कर 2018 मध्ये बेस्ट पिक्चरचा मान 'द शेप ऑफ वॉटर' ला मिळाला आहे.



बेस्ट अभिनेत्री म्हणून फ्रॅान्सिस मॅकडोरमांडला 'थ्री बिलबोर्ड्स आऊटसाइड एबिंग मिसौरी' या सिनेमाकरता मिळालं आहे.



सर्वोत्कृष्ठ अभिनेता गॅरी ओल्डमॅनला ऑस्कर मिळाला असून डार्केस्ट ऑवर या सिनेमाला हा पुरस्कार मिळाला आहे.



बेस्ट दिग्दर्शक म्हणून द शेप ऑफ वॉटर या सिनेमाच्या गिलियेरमो देल तोरोला ऑस्कर मिळाला आहे.



सिनेमा डीयर बास्केटबॉल या सिनेमाला बेस्ट शॉर्ट फिल्म अॅनिमिटेड हा ऑस्कर अवॉर्ड मिळाला. ग्लेन कीन आणि कोबी ब्रायंट स्टेजवर पोहोचले 



सपोर्टींग अभिनेत्री हा अवॉर्ड अॅलिसन जॅनीला I, Tonya या सिनेमासाठी मिळाला आहे.



सिनेमा 'ए फंटास्टिक वुमेन' ला बेस्ट फॉरेन लँग्वेजसाठी अवॉर्ड मिळाला. या सिनेमाला सेबस्टन लेलियोने दिग्दर्शित केलं आहे. बॉलिवूडमधून या कॅटेगिरीकरता राजकुमार रावचा न्यूटन हा सिनेमा पाठवला होता.



बेस्ट अॅनिमेटेड फीचरचा ऑस्कर 'कोको' ने जिंकल. या सिनेमाचे निर्माता ली अंकरिच आणि डार्ला एंडरसन आहेत.



बेस्ट प्रोडक्श डिझाइन करता 'शेप ऑफ वॉटर' या सिनेमाला ऑस्कर मिळाला आहे. या सिनेमाने 13 ऑस्कर नॉमिनेशन पटकावले आहेत.



Live Action Shot हा ऑस्कर पुरस्कार The Silent Child या सिनेमाला मिळाला आहे.



बेस्ट साऊंड एडिटिंगकरता सिनेमा डनकर्कला ऑस्कर मिळाला आहे. ग्रॅग लँडाकर, गॅरी रिज्जो आणि मार्क वेनगार्टनला बेस्ट साऊंड मिक्सिंगसाठी ऑस्कर मिळाला आहे.



बेस्ट साऊंड मिक्सिंगकरता डनकार्कला ऑस्कर मिळाला



अॅनिमिटेड फिचर फिल्म म्हणून कोको सिनेमाला मिळाला ऑस्कर



फॉरेन लँग्वेज फिल्म हा ऑस्कर अवॉर्ड अ फॅन्टास्टिक व्हुमन या सिनेमाला मिळाला