Oscars 2022 : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या यंदाच्या 94 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील वेळेनुसार ऑस्कर पुरस्कार सोहळा सकाळी 5 वाजता सुरू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘डय़ून’ सिनेमाला सर्वाधिक 6 पुरस्कार मिळाले आहेत.  6 पुरस्कारांवर नाव कोरत ''Dune'  सिनेमाचा ऑस्करमध्ये दबदबा पाहायला मिळत आहे. 


या सिनेमाचा सर्वत्र दबदबा पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये बेस्ट फिल्म एडिटिंग, बेस्ट ओरिजनल स्कोर, बेस्ट प्रोडक्शन डिजाईन, बेस्ट साउंड, बेस्ट विज्युअल इफेक्ट आणि बेस्ट सिनेमॅटोग्राफरसाठी पुरस्कार मिळाला आहे. 


दरम्यान, अँड द ऑस्कर गोज टू…हे शब्द ऐकण्यासाठी सर्वांचे कान आसुसले असतात.  'Dune'  सिनेमाला 6 पुरस्कार मिळाल्यानंतर सिनेमाच्या टीमला आनंद होत आहे.