Deepika Padukone In Oscars 2023: यंदाच्या वर्षी भारतीय कलाजगतात घडलेल्या घडामोडी नोंद करून ठेवाव्यात अशाच आहेत. त्यातलाच एक खास दिवस म्हणजे ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचा. अतिशय मानाचा समजला जाणारा अकादमी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं अभिनेत्री दीपिका पदुकोणनं यंदा पहिल्यांदाच चक्क ऑस्करच्या दरबारी हजेरी लावली. इतकंच नव्हे तर, ऑस्करच्या व्यासपीठावर जाऊन तिनं (Natu Natu) 'नाटू नाटू' या गाण्याची ओळख करून देत उपस्थित असणाऱ्या (Hollywood) हॉलिवूडकरांचं लक्ष वेधलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Deepika at oscars video) प्रचंड व्हायरल होत आहे. कारण, दीपिका ज्यावेळी गाण्याची माहिती देण्यासाठी आणि त्याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल अभिप्राय मांडण्यासाठी व्यासपीठावर आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर असणारं दडपण स्पष्टपणे पाहता येत होतं. जागतिक स्तरावर आपल्या देशाचं प्रतिनिधित्वं करताना काही चूक होऊ नये यासाठी गेतली जाणारी काळजी दीपिकाच्या बोलण्यातूनच व्यक्त झाली. 


हेसुद्धा पाहा : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दीपिकाच्या नजरेनं अनेकजण घायाळ; पाहा तिचा संपूर्ण लूक 


मुख्य मुद्दा असा, की दीपिका बोलताना एकदोनदा अडखळली, थांबली. पण, तिचं बोलणं ऐकून समोर असणाऱ्या हॉलिवूडकरांनी भारतीय कलाजगताता दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून हे क्षण तीसुद्धा मनात साठवत होती. सातासमुद्रापार आपल्या कलाकारांचं होणारं कौतुक पाहणं तिच्यासाठीसुद्धा तितकीच मोठी बाब होती. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ScoopWhoop (@scoopwhoop)


 


दीपिकामागोमाग 'नाटू नाटू' परफॉर्मन्स 


दीपिकानं मोठ्या कुतूहलानं राजामौलींच्या चित्रपटातील गाण्याची ओळख करून दिली आणि मागोमागच या गाण्यावरील परफॉर्मन्स सुरु झाला. काही मिनिटांच्या या सादरीकरणानंतर ऑस्करसाठी आलेल्या प्रत्येकानंच टाळ्यांचा कडकडाट करत या गाण्याला दाद दिली. याच गाण्याला ऑस्करमध्ये best original song या विभागात पुरस्कारही मिळाला. 


आपल्या चित्रपटाला मिळालेला हा मान पाहताना खुद्द राजामौलीसुद्धा भावूक धाले. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं भारतात 750 कोटींची रमाई केली. तर, जागतिक स्तरावर कमाईचा आकडा 1100 कोटी रुपये इतका होता. ज्युनियर एनटीआर, राम चरण यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटात अजय देवगन, आलिया भट्ट आणि श्रिया सरण यांच्या पाहुण्या कलाकारांच्याही भूमिका होत्या.