Oscars Awards 2023: जेव्हा ट्रॉफी घेण्याऐवजी अभिनेत्यानं अभिनेत्रीला Kiss केलेलं तेव्हा...
Oscars 2023: ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला आता काहीच वेळाच सुरूवात होणार आहेत तेव्हा सगळ्यांचेच लक्ष (Oscar 2023) हे या पुरस्कार सोहळ्याकडे लागून राहिले आहे. परंतु या मंचावरून घडलेल्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची सर्वत्र चर्चा होताना दिसते. त्यातीलच एक आहे ती म्हणजे अभिनेता एड्रीयन ब्रुडीनं (Adrien Brody kissed Halle Berry) अभिनेत्री हॅली बेरीच्या किसची.
Oscars 2023: ऑस्कर पुरस्कार सोहळा (Oscar Ceremony) हा जगातील नामवंत सोहळा म्हणून ओळखला जातो. या सोहळ्याला जगभरातील अनेक लोकप्रिय, अनुभवी, प्रतिष्ठावान आणि मानांकित मान्यवर उपस्थित राहतात. जगभरातील अनेकांच्या नजरा या सोहळ्यावर खिळलेल्या असतात. येत्या 13 मार्चला हा (Oscar 2023) पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात अनेक विभागांमधून पुरस्कार प्रदान केले जातात. परंतु फक्त पुरस्कारांसाठीच नाही तर या पुरस्कारासोहळ्यातून अनेकदा जगाच्या समाजकारणाचे, राजकारणाचे आणि संस्कृतीचे दर्शन घडले आहे. अनेक क्षण हे अंगावर शहारे आणणारे तर कधी खळखळून हसवणारेही होते. तर असे अनेक क्षण घडले आहेत ज्यानं अनेकांच्या डोळ्यात पाणीही (Oscar Memorable Moments) आलं आहे. तसेच असे अनेक प्रसंग घडले आहेत ज्यामुळे वादांनाही सुरूवात झाली होती. (Oscars 2023 when adrien brody kissed halle berry at oscar ceremony 2003 adrien brody was critized entertainment news in marathi)
परंतु ऑस्कर हा पुरस्कार सोहळ्याला आपण याची देही याची डोळा एकदा तरी पाहावे अशी आपल्यापैंकी अनेकांची धारणा असेलच. सध्या सर्वत्र चर्चा आहे ती ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची. त्यातून यावेळचा ऑस्कर सोहळा हा फारच खास आहे कारण यंदा भारताकडे त्यांच्या हक्काचा (Oscar Awards Nominations) ऑस्कर येणार का? याची उत्सुकता भारतीयांना लागून राहिली आहे.
नक्की काय घडले होते?
पुरस्कार सोहळ्याला पुरस्कार घेताना आपल्यापैंकी कुणाचाही आनंद गगनात मावेनासा होतो. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अशा अनेक आठवणी आहेत. परंतु त्यातला एक क्षण मात्र भलताच गाजला होता. ही गोष्ट आहे 2003 ची! ऑक्सरचा 75 वा पुरस्कार सोहळा होता. अभिनेत्री हॅली बेरी (Halle Berry) आणि अभिनेता एड्रीयन ब्रुडी (Adrien) यांच्या लॉन्गेस्ट कीसनं (Long Kiss) मोठा गदारोळ माजवला होता. एड्रीयन ब्रुडी या अभिनेत्याला ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला होता आणि एड्रीयन ब्रुडीनं तो जाहीर केला होता. आपलं नावं जाहीर होताच एड्रीयनचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्यानं स्टेजवर उभ्या असलेल्या हॅली बेरीला पुरस्काराची ट्रॉफी घेण्याऐवजी त्यानं जवळ घेतले आणि तिचे बराच वेळ चुंबन घेतले.
काय होते या प्रसंगाचे पडसाद?
या प्रसंगाचा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला होता. त्यावरही अनेकांनी नकारात्म कमेंट केल्या होत्या. काहींना महिलेच्या परवानगीविरूद्ध एखाद्या पुरूषानं किस करणं गैर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यातून त्या दोघांनाही या प्रसंगाबद्दल विचारण्यात आले होते. या प्रसंगानं मात्र मीटू चळवळीच्याही (Me too Movement) चर्चा सुरू झाल्या होत्या. आजही या प्रसंगाची अनेकदा चर्चा होताना दिसते. त्यावेळीही एड्रीयन आणि ऑस्करच्या मंडळींवर टीका झाली होती. 'द पियानिस्ट' या चित्रपटासाठी ए्ड्रीयनला पुरस्कार जाहीर झाला होता.